ओबीसी आरक्षण: निवडणूक घ्यावी की घेऊ नये?; प्रविण दरेकरांनी केलं मोठं विधान

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था घेण्यास बहुतेक राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी याबाबत एक मोठं विधान केलं आहे. (bjp leader pravin darekar reaction on obc reservation)

ओबीसी आरक्षण: निवडणूक घ्यावी की घेऊ नये?; प्रविण दरेकरांनी केलं मोठं विधान
pravin-darekar

मुंबई: ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था घेण्यास बहुतेक राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी याबाबत एक मोठं विधान केलं आहे. ज्या ठिकाणी ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणं शक्य आहे, तिथे निवडणूक झाली पाहिजे. अन्यथा निवडणुका पुढे ढकलाव्यात हाच पर्याय आहे, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. (bjp leader pravin darekar reaction on obc reservation)

प्रविण दरेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा पर्याय सांगितला. यावेळी त्यांनी ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांच्या आरोपांनाही उत्तर दिलं. आरक्षणाचा विषय चघळत ठेवण्याची त्यांची भूमिका आहे. मला ती योग्य वाटत नाही. किती डेटा गोळा केला पाहिजे याचे काही निकष असतात, असं दरेकर म्हणाले.

भाजपच्या आंदोलनात जनतेचा सहभाग

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंदिर आंदोलनावर टीका केली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपने पुकारलेल्या आंदोलनात जनतेचा सहभाग होता. हा महाराष्ट्र देवदेवतांना मानणारा आहे. मंदिरावर व्यवसाय करणारा मोठा वर्ग आहे. या आंदोलनावर टीका करणाऱ्यांनी रेस्टॉरंट आणि बार सुरू केले. त्यांनी आम्हाला तत्वज्ञान शिकवू नये. त्यांचे गर्दीत मेळावे सुरू आहेत. फक्त मंदिर सुरू केल्यानेच गर्दी वाढणार आहे का?, असा सवाल त्यांनी केला.

कुंपनच शेत खातंय

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या कार्यक्रमांना गर्दी होत आहे. त्यावरही त्यांनी टीका केली. कुंपनानेच शेत खाल्लं तर कसं चालेल? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांकडूनच नियम मोडले जात असतील तर सर्व सामान्यांना बोलण्याचा त्यांना अधिकार पोहोचत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

आज बैठक

दरम्यान, आज ओबीसी आरक्षणावर बैठक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित होत असलेल्या या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, नाना पटोले आदी नेते उपस्थित आहेत. यापूर्वी 27 ऑगस्टलाही एक सर्वपक्षीय बैठक पार पडली होती. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना, विविध पर्यांयाचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी येत्या शुक्रवारी यावर पुन्हा एक बैठक घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

सूचना व पर्यायांचा अभ्यास करुन बैठक

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे यावर सर्वपक्षांचे एकमत आहे. राजकीय आरक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत सर्वांनी केलेल्या सूचनांचे स्वागत आहे, असे मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाले होते. तसेच या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणासंबंधी विविध राजकीय पक्षांची मते समजून घेतली. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत ही सर्वांचीच भावना असल्याचे ठाकरे म्हणाले. दरम्यान बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना आणि पर्यायांचा येत्या काही दिवसात अभ्यास करून येत्या शुक्रवारी यासंबंधाने सर्व सहमतीने निर्णय घेऊ अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिली होती. (bjp leader pravin darekar reaction on obc reservation)

 

संबंधित बातम्या:

VIDEO: अनिल देशमुखांना फरार घोषित करा, त्यांची संपूर्ण संपत्ती जप्त करा; किरीट सोमय्यांची मागणी

साडे आठ टक्क्यांनी बेरोजगारी वाढली, ऑगस्ट महिन्यात साडेपंधरा लाख लोक बेरोजगार, जबाबदार कोण? राष्ट्रवादीचा सवाल

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्वपक्षीय बैठक, काय रणनिती ठरणार?

(bjp leader pravin darekar reaction on obc reservation)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI