राज्यपालांना विमान नाकरणं बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण, भाजप नेते विश्वास पाठकांचा हल्लाबोल

ठाकरे सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विमान नाकारल्याने पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष उफाळून आलाय.

राज्यपालांना विमान नाकरणं बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण, भाजप नेते विश्वास पाठकांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 4:14 PM

मुंबई : ठाकरे सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विमान नाकारल्याने पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष उफाळून आलाय. यानंतर भाजपने राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी राज्यपालांना विमान नाकारण्याचा ऊद्धव ठाकरे सरकारचा निर्णय त्यांची बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण असल्याचं म्हटलंय (BJP leader Vishwas Pathak criticize Uddhav Thackeray Government over denying airplane to Governor).

विश्वास पाठक म्हणाले, “राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. सरकारच्या यंत्रणा राज्यपालांच्याही दिमतीला असतात. राज्यपालांना विमान नाकारुन उद्धव ठाकरे सरकारने परत त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचं दर्शन घडवलंय. आम्ही वारंवार मागणी करतोय की उर्जामंत्री नितीन राऊत यांनी अनेकदा चार्टड विमान वापरले. त्याचे पैसे कुठून आले? तुम्ही सरकारी पैसा खर्च केलाय. तुम्ही याची चौकशी करत नाही आणि आज राज्यपालांना विमान नाकरलंय. हे ठाकरे सरकारच्या बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण आहे.”

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे.

कोश्यारी उत्तराखंडला का निघाले होते?

राज्यपालांना उत्तराखंडमधील मसुरीला आयएएस अकॅडमीच्या सांगता समारोपाला जायचं होतं. आठवड्यापूर्वी राज्यपाल कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यलयाला परवानगी मागितली होती. मुख्यमंत्री कार्यलयाडे परवनागी मागितली होती.

मुख्यमंत्री कार्यलयाकडून शेवटपर्यंत परवानगी मिळाली नाही. राज्यपाल सरकारी विमानाने मसुरीला जाणार होते. एका आठवड्यापूर्वी त्यांनी परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी न मिळाल्याने, राज्यपाल कोश्यारी खासगी विमानाने मसुरीला रवाना झाले. आज दुपारी 12.15 च्या विमानाने ते रवाना झाले.

राज्यपाल खासगी विमानाने रवाना

मुख्यमंत्री कार्यलयाकडून शेवटपर्यंत परवानगी मिळाली नाही. राज्यपाल सरकारी विमानाने मसुरीला जाणार होते. एका आठवड्यापूर्वी त्यांनी परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी न मिळाल्याने, राज्यपाल कोश्यारी खासगी विमानाने मसुरीला रवाना झाले. आज दुपारी 12.15 च्या विमानाने ते रवाना झाले. राज्यपाल डेहराडूनला स्पाईसजेट विमानाने रवाना झाले. सव्वा बाराचं विमान सव्वा दोनला डेहराडूनला पोहोचणार आहे.

अजित पवार यांची प्रतिक्रिया

मला याबाबत काहीच माहिती नाही. आता तुमच्याशी बोलल्यानंतर मला ही घटना कळलीय. माहिती घेऊन या घटनेवर बोलेन, असं अजित पवार राज्यपालांच्या विमानप्रवासाबाबत म्हणाले.

“राज्यपाल प्रकरणावर मला काहीही माहिती नाही. मी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन सांगेन. काय नक्की घडलं हे पूर्ण माहिती झाल्याशिवाय सांगता येणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांची प्रतिक्रिया

राज्यपालांना अद्यापही महाराष्ट्र सरकारच्या विमान वापरण्याची परवानगी दिली नव्हती. त्यांनी परवानगी मागितली होती. पण ते विमान उड्डाणास सक्षम आहे की नाही यासंदर्भात पुरेपूर माहिती नव्हती. त्यामुळे कदाचित परवानगी दिली नसेल. परवानगी नसताना तांत्रिकदृष्ट्या प्रवास करणे योग्य नाही. मी अधिक माहिती नक्की घेईन. आम्ही महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांचा नेहमीच आदर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांचा आदर केला आहे. , त्यांचा अवमान कदापिही होणार नाही, असं शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले.

ते विमान नेमकं कोणाचं? 

जे एअरक्राफ्ट आहे ते महाराष्ट्र सरकारचं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते वापरु शकतात. इतरांना ते वापरायचं असेल तर त्याची पूर्व परवानगी घ्यावी लागते. इतरांना ते विमान देणं सक्तीचं नाही. जोपर्यंत परवानगी मिळत नाही, तोपर्यंत ते वापरणं शक्य नाही, असंही खासदार विनायक राऊत म्हणाले.

हेही वाचा :

राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली, विमानातून उतरुन कोश्यारी राजभवनात

Maharashtra Governor vs Thackeray Government LIVE : नियमाचं पालन करणं हा अहंकार आहे का? : संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला

‘इतका इगो असेलेलं सरकार राज्याच्या इतिहासात पाहिलं नाही’, फडणवीसांचा हल्लाबोल

राज्यपाल प्रकरणी जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आवाज चढतो!

व्हिडीओ पाहा :

BJP leader Vishwas Pathak criticize Uddhav Thackeray Government over denying airplane to Governor

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.