AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप नेते मोदींचंसुद्धा ऐकत नाहीत; लोकल ट्रेन आणि मंदिरे उघडण्यासाठीच्या आंदोलनावरुन नवाब मलिकांचा टोला

नरेंद्र मोदींच्या भूमिकेला विरोध करुन भाजप नेते मोदींचे पण ऐकत नाहीत, हे सिद्ध होत आहे. हे जनहितासाठी की मतासाठी सुरु आहे याचं उत्तर तेच देऊ शकतात, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

भाजप नेते मोदींचंसुद्धा ऐकत नाहीत; लोकल ट्रेन आणि मंदिरे उघडण्यासाठीच्या आंदोलनावरुन नवाब मलिकांचा टोला
नवाब मलिक, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 08, 2021 | 4:35 PM
Share

मुंबई : कोरोनाचे संकट टाळण्यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिका घेत आहेत. मात्र याला विरोध करुन भाजप नेते मोदींचे पण ऐकत नाहीत, हे सिद्ध होत आहे. हे जनहितासाठी की मतासाठी सुरु आहे याचं उत्तर तेच देऊ शकतात, असा टोला अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे. (BJP leaders do not even listen to Narendra Modi; Nawab Malik slams BJP)

भाजपचे नेते लोकल ट्रेन सर्वसाधारण लोकांसाठी सुरू व्हावी म्हणून व मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सणासुदीला गर्दी होणार असल्याने चिंतेत आहेत. त्यांनी त्याचपध्दतीने काळजी घेण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येईल तसतशी अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे अगोदरच सांगितले आहे. मात्र याउलट भाजप नेते वागत असून मंदिरे उघडण्यासाठी व लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी आंदोलने करत आहेत, या दुटप्पी भूमिकेबद्दल नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सुशांतसिंग प्रकरण महाराष्ट्राला बदनाम करण्याचा कट : मलिक

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार निशाना साधला आहे. सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये ही हत्या की आत्महत्या होती हे सीबीआयने एक वर्ष झाले तरी स्पष्ट केले नाही. याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयने ताब्यात घेऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे मात्र अजूनही यामध्ये सीबीआयने कोणताच खुलासा केला नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. एखादी घटना घडली की त्या – त्या राज्यात तपास राहतो मात्र सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात बिहार सरकारने त्यांच्या हद्दीत हत्येचा गुन्हा दाखल करुन प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी दिले होते. सीबीआय एक वर्ष या प्रकरणाचा तपास करतेय आणि अजून ही हत्या की आत्महत्या हे सांगू शकलेली नाही, असे मलिक म्हणाले. बिहार निवडणुकीत राजकीय फायदा उठवण्यासाठीच सुशांतप्रकरण रंगवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, सिद्धार्थ पिठानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात सर्वात मोठी कारवाई, रुममेट सिद्धार्थ पिठाणीला अटक

सिद्धार्थ पिठाणीची अटक रियाला देखील अडचणीत आणणार? अडचणी आणखी वाढण्याची शक्यता!

(BJP leaders do not even listen to Narendra Modi; Nawab Malik slams BJP)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?