आरोग्य विद्यापीठाच्या वेबसाईटवरुन झाकीर नाईकचे नाव हटवा, अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 'यशस्वी विद्यार्थ्यां'मधून देशद्रोहाचा गुन्हा दाखल असेलेले वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईकचे नाव अधिकृत वेबसाईटवरुन तात्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. BJP MLA Atul Bhatkhalkar demanded to remove name of Zakir Naik from website of Maharashtra Health University

आरोग्य विद्यापीठाच्या वेबसाईटवरुन झाकीर नाईकचे नाव हटवा, अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘यशस्वी विद्यार्थ्यां’मधून देशद्रोहाचा गुन्हा दाखल असेलेले वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईकचे नाव अधिकृत वेबसाईटवरुन तात्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. झाकीर नाईकचे नाव 24 तासांच्या आत न हटवल्यास आंदोलन करण्यााच इशारा भातखळकर यांनी दिला आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar demanded to remove name of zakir naik from website of Maharashtra Health University)

“दहशतवादी कारवायांमध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागाप्रकरणी झाकीर नाईक आरोपी असून चौकशी टाळण्यासाठी तो फरार झाला आहे. करोडो रुपयांची अफरातफर व हवाला रॅकेट प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. बांग्लादेश, इंग्लंड यांसह अनेक देशांमध्ये जाकीर नाईकला प्रवेशास व ऑनलाइन भाषण देण्यास सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे”,असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीचे नाव एखाद्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत नोंदवणे ही अत्यंत आक्षेपार्ह व लाजिरवाणी बाब असून राज्य सरकारने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वेबसाईटवरून झाकीर नाईक याचे नाव हटविण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

झाकीर नाईकचे नाव हटवण्यासंदर्भात पुढील २४ तासांत कारवाई न केल्यास भाजप राज्यभर आंदोलन करणार आहे.आगामी अधिवेशनात या विरोधात आवाज उठविणार असल्याचे सुद्धा भातखळकर म्हणाले.

दरम्यान, झाकीर नाईकने काही दिवसांपूर्वी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. इस्लामिक देशांमध्ये बिगर मुस्लीम भारतीय प्रवेश करतील त्यावेळी त्यांची चौकशी करावी. मुहम्मद पैंगबरांवर टीका केली असल्याची समोर आल्यास अटक करावी, असा सल्ला झाकीर नाईकने दिला होता. झाकीर नाईक भारतातून फरार झाला असून तो मलेशियात आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी मदत हवेय ना, मग केंद्रासोबत कटुता कशाला वाढवता- अतुल भातखळकर

Atul Bhatkalkar | राज्यातील मदरसे बंद करुन दाखवा, अतुल भातखळकरांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

(BJP MLA Atul Bhatkhalkar demanded to remove name of zakir naik from website of Maharashtra Health University)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI