AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे नाही तर देवेंद्र फडणवीस हे 2024 नंतर मुख्यमंत्री होणार? भाजप आमदाराचा मोठा दावा

बच्चू कडू यांनी नुकतंच एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता प्रसाद लाड यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. प्रसाद लाड यांचं वक्तव्य आगामी काळातील राजकारणासाठी जास्त महत्त्वाचं आहे. कारण ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत.

एकनाथ शिंदे नाही तर देवेंद्र फडणवीस हे 2024 नंतर मुख्यमंत्री होणार? भाजप आमदाराचा मोठा दावा
eknath shinde and devendra fadnavis
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Sep 23, 2023 | 2:48 PM
Share

गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून मोठं बंड पुकारलं आणि त्यानंतर राज्यात सत्तांतर घडून आलं. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनले. महाविकास आघाडीत मंत्री असलेले अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये विरोधी पक्षनेते बनले. पण त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि अजित पवार सत्ताधारी पक्षाच्या युतीतले प्रमुख घटक बनले. ते राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री बनले. या सर्व घडामोडींनंतर आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे.

राज्याच्या राजकारणात आता नवी पहाट होणार आहे. ही पहाट म्हणजे देशातील आगामी काळातील लोकसभा निवडणूक. त्यानंतर राज्यात असणारी विधानसभा निवडणूक. या निवडणुकांसाठी राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आलाय. प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. प्रत्येकाला आगामी निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकून राजकारणात मोठं अस्तित्व निर्माण करायचं आहे. त्यासाठी घडामोडी सुरु झाल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री’

पुढच्या वर्षी असणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, यावरुन सत्ताधारी पक्षांकडून दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी अनेकवेळा आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील, असं सांगितलं आहे. तसेच 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलं आहे. असं असताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी वेगळं वक्तव्य केलं आहे.

प्रसाद लाड म्हणतात, ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार’

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’च्या कार्यालायत येवून बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं. “निश्चितपणे यात काही शंका नाहीय. बाप्पाने निश्चितच केलंय. 2024 नाही, तर 2034 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार या देशात राहील. राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सरकार स्थापन होईल आणि देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री होतील”, असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं.

संजय शिरसाट म्हणाले…

प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं. “प्रसाद लाड हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांनी त्यांच्या नेत्याचं नाव घेणं काही गैर नाही. आम्हालाही वाटतं की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. अजित पवार यांच्या गटाला वाटतं की, अजित पवार मुख्यमंत्री होतील”, असं संजय शिरसाट म्हणाले.

“राजकारणात प्रत्येक पक्षाचा जो कार्यकर्ता असतो, त्याला निश्चितच असं वाटत असतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. त्यामुळे प्रसाद लाड यांच्या म्हणण्यानुसार आमचंही म्हणणं आहे की, एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करत आहेत, पुढील वेळेला तेच मुख्यमंत्री राहावेत, अशी आमची इच्छा आहे”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.

Follow Us
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर