‘अजितदादा, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची काय लायकी राहिली असती?’

| Updated on: Jun 07, 2021 | 12:48 PM

मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये. | Ajit Pawar Nilesh Rane

अजितदादा, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची काय लायकी राहिली असती?
अजित पवार आणि निलेश राणे
Follow us on

मुंबई: पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर अजित पवार यांची काय लायकी राहिली असती, अशी जळजळीत टीका भाजप नेते निलेश राणे (Nilehs Rane) यांनी केली आहे. अजित पवार यांनी रविवारी मराठा मोर्चा काढणाऱ्या नरेंद्र पाटील यांना लक्ष्य केले होते. यावरुन निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला. (BJP leader Nilesh Rane slams Ajit Pawar over Maratha Reservation issue)

निलेश राणे यांनी ट्विट करुन अजित पवार यांना खडेबोल सुनावले. अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात त्यात काही नवीन नाही. पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये. मराठ्यांचा अपमान करू नका, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा, असे निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अजित पवारांनी बाता मारु नये, ते एक ग्रामपंचायत सदस्यही निवडून आणू शकत नाही : निलेश राणे

मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या नरेंद्र पाटलांवर अजितदादांचा निशाणा

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारणारे माथाडी समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कडाडून टीका केली आहे. काहीजण भावनेच्या आहारी जाऊन बोलतात. कायदा आणि संविधान बघत नाहीत. ही लोकं काही काळ आमच्यासोबत होती. त्यामुळे या नेत्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो, असे अजित पवार यांनी म्हटले.

मराठा आरक्षणासंदर्भात विरोधकांची भूमिका दुटप्पी

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले असते तर विरोधकांनी त्याचे श्रेय घेतले असते. आम्हीच मराठा आरक्षणाचा कायदा केला होता. आम्हीच असं केलं होतं, असे भाजपचे नेते म्हणाले असते. भाजप नेत्यांच्या याच वृत्तीचा मला राग येतो, असे अजित पवार यांनी म्हटले.
राज्य सरकारला सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे सारथी संस्थेसंदर्भात योग्य वेळ आल्यावर निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

अजितदादा, ओबीसी नेते एकत्र येतात, मग आपण का नाही; नरेंद्र पाटलांचा पलटवार

त्यांचा आवाका कितपत, हे आम्हाला माहितीये; मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या नेत्यावर अजितदादांचा निशाणा

मोठी बातमी: विनापरवानगी मोर्चा काढल्याबद्दल विनायक मेटे आणि नरेंद्र पाटलांवर गुन्हा दाखल

(BJP leader Nilesh Rane slams Ajit Pawar over Maratha Reservation issue)