BMC commissioner transferred | मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशींना हटवलं

सचिन पाटील

|

Updated on: May 08, 2020 | 7:05 PM

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना हटवण्यात (BMC commissioner Praveen Pardeshi transferred) आलं आहे. त्यांची बदली करण्यात आली आहे.

BMC commissioner transferred | मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशींना हटवलं

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना हटवण्यात (BMC commissioner Praveen Pardeshi transferred) आलं आहे. ठाकरे सरकारने मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली केली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आवरत नसल्याने ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे.  प्रवीण परदेशी यांना नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. प्रवीण परदेशी यांच्या जागी इक्बाल चहल हे मुंबई मनपाचे नवे आयुक्त असतील. (BMC commissioner Praveen Pardeshi transferred)

मुंबई महापालिका आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्तांनाही हटवण्यात आलं आहे. मुंबई मनपातील अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाडांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे मनपाचे माजी आयुक्त संजीव जैस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानेच प्रवीण परदेशी यांना हटवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. प्रविण परदेशी यांच्या अनेक निर्णय देखील वादात सापडले होते. त्यांच्या या निर्णयांबद्दल अनेक मंत्र्यांनी तक्रारीही केल्या होत्या. त्यांच्यावर परस्पर निर्णय घेतल्याचाही आरोप होत होता.

प्रविण परदेशी यांनी मे 2019 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. याआधी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं आहे. परदेशी यांनी आपल्या 29 वर्षांच्या कार्यकाळात लातूर आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिलं आहे.

कोण आहेत प्रवीण परदेशी?

  • प्रवीण परदेशी हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
  • त्यांनी मे 2019 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा भार स्वीकारला होता.
  • प्रवीण परेदशी हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले अधिकारी असल्याचं सांगण्यात येतं
  • परदेशींनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं आहे.
  • फडणवीसांच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, वन, पर्यावरण, अर्थ, नगर विकास व महसूल अशा विविध विभागांत जबाबदारी सांभाळलेली आहे.
  • 1993 मध्ये लातूरमध्ये भूकंप झाला होता तेव्हा परदेशी लातूरचे जिल्हाधिकारी होते.
  • तेव्हा त्यांनी जो कामाचा धडाका दाखवला होता त्याची मोठी प्रशंसा झाली होती.
  • देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी लगेचच परदेशी यांना आपल्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी आणले होते.
  • परदेशी यांच्यावर फडणवीस यांनी नेहमीच विश्वास दाखवला होता.
  • पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

कोण आहेत इक्बाल चहल?

  • इक्बाल चहल हे 1989 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत
  • नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असलेले इक्बाल चहल आता नवे मुंबई पालिका आयुक्त असतील
  • इक्बाल चहल यांनी यापूर्वी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिलं आहे
  • इक्बाल चहल हे शारिरिकदृष्ट्या फिट अधिकारी म्हणून ओळखले जातात
  • इक्बाल चहल हे 2004 पासून सलग मुंबई मॅरोथॉनमध्ये सहभागी होतात.

प्रवीण परदेशींना बळीचा बकरा बनवला : सोमय्या

किरिट सोमय्या म्हणाले, “प्रविण परदेशी यांनी केवळ बळीचा बकरा बनवला आहे. मागील 23 वर्षे मुंबई महानगरपालिकेत ठाकरे परिवाराचं राज्य आहे. आता ठाकरे परिवारातील व्यक्ती मुख्यमंत्री आहेत. ठाकरे परिवारीतील एक व्यक्ती मुंबईचे पालकमंत्री आहेत. मागील 50 दिवसांची कोरोनाची लढाई सुरु आहे. मग ती काय केवळ प्रशासन चालवत होतं का? मग राजकीय नेतृत्त्व काय करत होतं? मुख्यमंत्री घरातून बाहेर पडू शकत नाही. त्यांची हिंमत नाही का तेवढी?”

विरोधी पक्षनेत्यांचं टीकास्त्र

आपली जबाबदारी झटकण्यासाठी आयुंक्ताची बदली हा मार्ग नाही! अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्याऐवजी उपाययोजना सशक्त आणि गतिमान करण्याची आवश्यकता आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI