आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयाची ईडीकडून तब्बल 17 तास चौकशी; चेंबूर येथील घरी काय घडलं?

ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि आदित्य ठाकरे यांचे खास सहकारी सुरज चव्हाण यांच्या घरी ईडीने तब्बल 17 तास चौकशी केली. सकाळी 9 वाजता आलेले ईडीचे अधिकारी रात्री दीड वाजता घराबाहेर पडले. यावेळीही शिवसैनिक चव्हाण यांच्या घराबाहेर होते.

आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयाची ईडीकडून तब्बल 17 तास चौकशी; चेंबूर येथील घरी काय घडलं?
suraj chavan Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 6:46 AM

मुंबई : आदित्य ठाकरे यांचे खास आणि ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी काल ईडीने छापेमारी केली. ईडीचे अधिकारी सकाळी 9 वाजता सुरज चव्हाण यांच्या घरी आले. ते रात्री दीड वाजता अधिकारी घराच्या बाहेर पडले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुरज चव्हाण यांच्या घरात तब्बल सतरा तास झाडाझडती घेतली. घरातील कागदपत्रांची छाननी केली. तसेच चव्हाण यांचीही चौकशी केल्याचं सांगितलं जातं. ईडीच्या हाती काही लागले की नाही याचा तपशील मिळू शकला नाही. मात्र, ईडीने एवढ्या तास चौकशी केल्याने चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे.

सुरज चव्हाण हे चेंबूरच्या के के ग्रँड इमारतीतील 11 व्या मजल्यावर राहतात. या इमारतीत सकाळी 9 वाजता ईडीचे अधिकारी आले होते. या अधिकाऱ्यांनी रात्री 1:30 वाजेपर्यंत सुरज चव्हाण यांच्या घराची झाडाझडती घेतली. चव्हाण यांच्यासह घरातील सदस्यांची चौकशी केली आणि त्यानंतर साडे सोळा तासाने निघून गेले. या काळात चव्हाण यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. कुणालाही आत सोडलं जात नव्हतं. तसेच कुणालाही बाहेर जाऊ दिलं जात नव्हतं. घरातील सदस्यांना फोन करण्यास मज्जाव करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

रात्री दीड वाजता शिवसैनिकांची गर्दी

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुरज चव्हाण यांच्या घरी छापेमारी केल्याची माहिती मिळताच शिवसैनिकांनी चव्हाण यांच्या घराबाहेर प्रचंड गर्दी केली. यावेळी शिवसैनिकांनी ईडी आणि राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. केवळ त्रास देण्यासाठी या चौकश्या सुरू आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी हा दबाव टाकला जात आहे. पण हे अधिककाळ चालणार नाही, आम्ही सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला. दरम्यान, ईडीचे अधिकारी चौकशी करून गेल्यानंतरही रात्री दीड वाजता शिवसैनिकांनी सुरज चव्हाण यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करण्यासाठी गर्दी केली होती.

मस्तपैकी बसले आहेत

दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी सुरज चव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु चौकशी चालू असल्यामुळे त्यांना भेटू दिले नाही. त्यानंतर फातर्पेकर यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी चव्हाण यांच्या घरात नेमकं काय चाललंय याची आँखो देखीच फातर्पेकर यांनी सांगितली. चौकशी वगैरे सुरू नाही ते मस्तपैकी बसलेले आहेत. चौकशी होत नाही. दबाव तंत्र आहे. कोण करतो काय करत आहे हे सगळ्यांना माहीत आहे. आम्ही या दबावतंत्राला बळी पडणार नाही. या सगळ्या गोष्टींना आम्ही फेस करू, असं फातर्पेकर म्हणाले.

शिंदे गटात जाणार नाही

अधिकारी नुसते बसून आहेत नुसतं बसून काय करणार? 6 वाजता घरी जाणार एवढेच काम करणार का? घोटाळा झाला तो किरीट सौमय्या यांना माहिती आहे तर त्यांनी बाहेर काढावा. शिवसैनिकांवर भाजपकडून दबाव तंत्राचा वापर केला जातोय, काही झालं तरी मी शिंदे गटात जाणार नाही. जनता यांना उत्तर देईल, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.