मुंबई महापालिकेची दिवाळी भेट; कामगारांना 15 हजार 500 रुपये बोनस जाहीर

मुंबई महापालिका कामगारांना यंदा 15 हजार 500 रुपये बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज केली.

मुंबई महापालिकेची दिवाळी भेट; कामगारांना 15 हजार 500 रुपये बोनस जाहीर
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 3:59 PM

मुंबई: मुंबई महापालिका कामगारांना यंदा 15 हजार 500 रुपये बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज केली. यंदा कोरोनाचं संकट असल्यामुळे कामगारांच्या बोनसमध्ये गेल्यावर्षीपेक्षा फक्त 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिवाळीला अवघे काही दिवस बाकी असताना मुंबई महापालिकेने कामगारांसाठी ही मोठी भेट देऊन कामगारांची दिवाळी गोड केली आहे. (BMC declares Rs 15500 Diwali Bonus for workers)

कामगार संघटनांनी पालिका कामगारांना 20 हजार रुपये बोनस देण्याची मागणी केली होती. त्यामुळे चर्चेचं घोडं आडलं होतं. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत हा तिढा सोडवला. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कामगारांचा बोनस जाहीर केला. यानुसार पालिका कामगारांना 15 हजार 500, अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 7750, शिक्षण खात्यात मनपा प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना 4700 आणि अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना 2350 रुपये बोनस देण्यात येणार आहे. शिवाय सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 4400 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा किशोरी पेडणेकर यांनी केली. आज झालेल्या बोनसनुसार पालिका कामगारांच्या बोनसमध्ये गेल्यावर्षीपेक्षा यंदा फक्त 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

बाबाासाहेबांमुळेच कामगारांच्या घरी दिवाळी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व प्रथम बोनस ही संकल्पना अस्तित्वात आणली. त्यांच्यामुळे कामगारांना बोनस मिळू लागला. त्यामुळे आजही कामगारांच्या घरी दिवाळी साजरी होत आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

दरम्यान, यंदा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस हा 20 हजार रुपये देण्यात यावा अशी मागणी सर्व युनियन्सकडून करण्यात आली होती. मात्र कोरोना संकटामुळे कामगारांच्या गेल्यावर्षीच्याच बोनसला कात्री लावली जाण्याची शक्यता होती. परंतु, मागील वर्षाच्या बोनस रकमेत कुठेही कपात करू नका, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका आयुक्तांना दिले होते.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जवळपास 7 महिने सगळे व्यवहार ठप्प होते. याला देशाची आर्थिक राजधानी मुंबई देखील अपवाद नव्हती. त्याचमुळे मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती म्हणावी अशी चांगली नाहीये. अशा परिस्थितीत देखील कोरोनाच्या काळात पालिकेचे कर्मचारी अहोरात्र मेहनत करत आहेत. त्यामुळे यंदा सुद्धा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यामुळे यंदा बोनसमध्ये कपात न करता 500 रुपयांची वाढ करून कामगारांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न पालिकेने केला आहे.

कुणाला किती बोनस…

  • पालिका कामगारांना 15 हजार 500 रुपये
  • अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 7750 रुपये
  • मनपा प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना 4700 रुपये
  • अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना 2350 रुपये
  • सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 4400 रुपये

संबंधित बातम्या:

पालिका कर्मचाऱ्यांना 15 हजार बोनस?, सोमवारी बोनस जाहीर होणार; मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा यशस्वी

यंदा दिवाळीत बोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन, पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.