यंदा दिवाळीत बोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन, पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा

कंत्राटदारांकडून या परिपत्रकाची अंमलबजावणी केली जात नाही, असा दावा कंत्राटी कर्मचारी करत आहेत. (PMC Contract Employees Agitation for Diwali Bonus)

यंदा दिवाळीत बोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन, पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा
पुणे महापालिका
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 9:35 AM

पुणे : दर महिना वेतनातून कापला जाणारा हक्काचा बोनस न मिळाल्यास आंदोलन करु, असा इशारा पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. पुण्यातील कंत्राटी कामगार युनियनचे अध्यक्ष उदय भट आणि सरचिटणीस मुक्ता मनोहर यांनी याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. (PMC Contract Employees Agitation for Diwali Bonus)

कंत्राटी कामगारांना संबंधित कंत्राटदाराने दिवाळीत बोनस द्यावा, म्हणून महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही परिपत्रक काढले आहे. मात्र, प्रत्यक्षात कंत्राटदारांकडून या परिपत्रकाची अंमलबजावणी केली जात नाही, असा दावा कंत्राटी कर्मचारी करत आहेत.

कंत्राटी कामगारांच्या पगारातून दर महिना 1500 ते 3000 इतकी रक्कम कापली जाते. तसेच नियमाप्रमाणे 8.33 टक्के बोनस दिला पाहिजे. त्यामुळे आमची हक्काची ही रक्कम आम्हाला मिळावी, असे कंत्राटी कामगारांचे म्हणणे आहे.

दरवर्षी दिवाळीत अतिशय तुटपुंजी रक्कम कामगारांना बोनस स्वरुपात दिली जाते. त्यामुळे महापालिकेच्या परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. तसेच कंत्राटी कामगारांची आर्थिक फसवणूक होते. याप्रकरणी पुणे महापालिकेने याची दखल घेतली नाही, तर ऐन दिवाळीत आंदोलन करु, असा पवित्रा पुणे महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष उदय भट आणि सरचिटणीस मुक्ता मनोहर यांनी दिला आहे.  (PMC Contract Employees Agitation for Diwali Bonus)

संबंधित बातम्या : 

सरकारकडून आदिवासींची क्रूर चेष्टा, अळ्या पडलेल्या आणि सडक्या तांदळाचे वाटप

Non Stop LIVE Update
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.