मुंबईतील शाळांना मराठी भाषेतून नावाची सक्ती, बीएमसीकडून परिपत्रक जारी

| Updated on: Apr 06, 2022 | 10:56 AM

मुंबई महापालिकेकडून आता मुंबईतील सर्व शाळांना मराठीतून नाव सक्तीचे करण्यात आले आहे. या संदंर्भात बीएमसीच्या शिक्षण विभागाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

मुंबईतील शाळांना मराठी भाषेतून नावाची सक्ती, बीएमसीकडून परिपत्रक जारी
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई (Mumbai) महापालिकेकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता इथूनपुढे मुंबईतील प्रत्येक शाळाच्या पुढे मराठी (Marathi language)  नावाची पाटी दिसणार आहे. याबाबत मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून (Mumbai Municipal Corporation) परिपत्रकाद्वारे आदेश जारी करण्यात आले आहेत. नव्या आदेशानुसार इथूनपुढे शाळा कोणत्याही माध्यमाची असली तरी देखील शाळेसमोर मराठी भाषेतून बोर्ड लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक शाळेपुढे  आठ बाय तीन फूटाच्या बोर्डावर संबंधित शाळेचे नाव हे मराठी देवनागरी लिपीतून असावे असे म्हटले आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे मराठी भाषेला चालना मिळणार आहे. अनेक शाळांसमोर मराठी नावाची पाटी दिसत नाही, मात्र या निर्णयामुळे आता प्रत्येक शाळेसमोर मराठी नावाची पाटी दिसणार आहे.

काय म्हटलंय परिपत्रकात?

मुंबईतील प्रत्येक शाळेचे नाव हे मराठीतून असावे यासाठी आता मुंबई महापालिकेच्या वतीने एक परित्रक देखील काढण्यात आले आहे. प्रत्येक शाळेने आपल्या शाळेसमोर आठ बाय तीन फूटाचा बोर्ड लावावा. या बोर्डवर संबंधित शाळेचे मराठीतून नाव टाकण्यात यावे असे या परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे आता मुंबईतील प्रत्येक शाळेत इथून पुढे आपल्याला मराठी नावाच्या पाट्या पहायला मिळणार आहेत.

मराठी भाषेला चालना

मुंबईत मराठी भाषिकांसोबतच हिंदी भाषिकांची संख्या देखील मोठ्या संख्येने आहे. बोलताना सर्रासपणे हिंदी अथवा इग्रजीचा उपयोग केला जातो. दुकानाच्या पाट्या देखील इंग्रजीमध्ये असल्याच्या पहायला मिळतात.  दुकानाच्या पाट्या या मराठीमध्ये असाव्यात अशी भूमिका मनसेने घेतली होती. त्यानंतर आता मुंबईतील सर्व शाळांना आपली नावे मराठीतून लिहिण्याची सक्ती  मुंबई महामालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. यामुळे मराठी भाषेला चालना मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

 

संबंधित बातम्या

Sanjay Raut : मुंबईकरांच्या भावनांशी खेळ, INS विक्रांतच्या नावाखाली 57 कोटी रुपये घशात घातले, राऊतांचा सोमय्यांवर आरोप

राऊतांनी टाइमपास न करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुरावे द्यावे; आयएनएस विक्रांतप्रकरणी सोमय्यांचे आव्हान

MNS vs Shivsena : शिवसेनेचा रंग हिरवा झाला, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेनं पुन्हा डिवचलं, शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी