
महाराष्ट्राच्या राजकारणात किरीट सोमय्या हे नाव नेहमीच चर्चेत असतं. आर्थिक घोटाळे, भ्रष्टाचाराची प्रकरणं ते नेहमी बाहेर काढत असतात. मुंबई विद्यापाठीतून बिझनेस पॉलिसी आणि एडमिनिस्ट्रेशनमध्ये पीएचडी करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आर्थिक घोटाळे बाहेर काढण्याची राजकीय शैली निवडली. सोमय्या यांच्या आर्थिक मुद्यांभोवतीच्या या राजकारणातून अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि कृपाशंकर सिंह सारखे नेते सुटू शकले नाहीत. किरीट सोमय्या यांनी उत्तर पू्र्व लोकसभा मतदारसंघातून दोनवेळा खासदारकीची निवडणूक जिंकली. मागच्या काही काळापासून पक्षातून ते साइड लाइन झाले आहेत. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांचा मुलगा नील सोमय्याला वॉर्ड क्रमांक 107 मधून दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. यावेळी नील सोमय्यांचा मार्ग मोकळा आहे. कारण विरोधी पक्षाने कुठलाही उमेदवार दिलेला नाही.
नील सोमय्या भाजप उमेदवार असल्याने त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच समर्थन आहे. नील सोमय्या यांना विरोधी पक्षांनी वॉकओव्हर दिला आहे. विरोधी पक्षाचा कुठलाही उमेदवार किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या विरोधात निवडणूक रिंगणात नाहीय. हा योगायोग आहे की कुठला प्रयोग?. मुंबईच्या मुलुंडमधील वॉर्ड क्रमांक 107 मधून भाजप उमेदवार नील सोमय्य यांच्याविरुद्ध राज आणि उद्धव ठाकरे यांनी कोणताही उमेदवार दिलेला नाही.
पाच वॉर्डात अन्य पक्षांचे उमेदवार
किरीट सोमय्या यांचा मुलगा नील 2017 साली पहिल्यांदा मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक 107 मधून निवडून आला. आता दुसऱ्यांदा पुन्हा भाजपच्या तिकीटावर नील सोमय्या रिंगणात आहे. विरोधी पक्षाचा एकही उमेदवार नाहीय. मुलुंड विधानसभा क्षेत्रात सहावॉर्ड आहेत. फक्त 107 वॉर्ड सोडून पाच वॉर्डात अन्य पक्षांचे उमेदवार आहेत.
ठाकरे बंधुंनी का उमेदवार दिला नाही?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी एकही उमेदवार वॉर्ड क्रमांक 107 मधून उतरवलेला नाही. कारण ही जागा त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी सोडली होती. ठाकरे बंधु आणि शरद पवार यांच्या पक्षाची आघाडी आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने हंसराज दानानी यांना 107 वॉर्डातून उमेदवारी दिलेली. दानानी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. एनसीपी उमेदवाराचा अर्ज यासाठी फेटाळण्यात आला, कारण त्याने उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दिलं नाही. आता किरीट सोमय्या यांच्या मुलाचा विजय पक्का मानला जात आहे.
काँग्रेसने का उमेदवार दिला नाही?
शिवसेना यूबीटी, राज ठाकरे मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार नसला, तरी नील सोमय्या यांना निवडणूक लढवावी लागेल. काँग्रेसने या जागेवर आपला उमेदवार यासाठी दिला नाही कारण त्यांनी ही सीट वंचित बहुजन आघाडीला सोडली होती. मुंबईत काँग्रेस आणि वंचितची आघाडी आहे. वंचितसह 9 अपक्ष उमेदवार वॉर्ड क्रमांक 107 मधून रिंगणात आहेत. नील सोमय्या यांचा मार्ग सोपा दिसत असला, तरी त्याला विजयासाठी संघर्ष करावा लागेल.