AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जोगेश्वरी ते कुलाबा… शिवसेना शिंदे गटाचे 91 उमेदवार रिंगणात, कोणाला डच्चू, कोणाला संधी? पाहा संपूर्ण यादी

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाने ९१ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यामध्ये महिला उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात आले असून वरळी, जोगेश्वरी आणि दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या नावांचा समावेश आहे.

जोगेश्वरी ते कुलाबा... शिवसेना शिंदे गटाचे 91 उमेदवार रिंगणात, कोणाला डच्चू, कोणाला संधी? पाहा संपूर्ण यादी
Eknath Shinde Shiv Sena Candidate List
| Updated on: Jan 02, 2026 | 8:54 AM
Share

राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गटाने मुंबई महापालिका निवडणूक लढवणाऱ्या ९१ उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये मुंबईतील विविध लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमधील कार्यकर्त्यांना आणि अनुभवी नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात महिला उमेदवारांच्या संख्येवर विशेष भर देण्यात आल्याचे दिसून येते. बोरिवली, दहिसर, मागाठाणे यांसारख्या उत्तर मुंबईतील मतदारसंघांपासून ते दक्षिण मुंबईतील कुलाबा आणि मुंबादेवीपर्यंतच्या उमेदवारांची नावे यात निश्चित करण्यात आली आहेत.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाने जाहीर केलेल्या यादीनुसार, जोगेश्वरी पूर्वमधून दीप्ती वायकर आणि प्रियंका आंबोळकर, तर वरळी मतदारसंघातून वनिता नरवणकर आणि वंदना गवळी यांसारख्या महिला उमेदवारांना मैदानात उतरवण्यात आले आहे. तसेच भायखळा येथून यामिनी यशवंत जाधव आणि शिवडीतून अनिल कोकीळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यात प्रत्येक उमेदवाराचा वार्ड क्रमांक नमूद करण्यात आला आहेत. आता आजपासून सर्वत्र प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

शिवसेना उमेदवारांची यादी

अ.क्र. लोकसभा विधानसभा वार्ड क्रमांक उमेदवार
1 मुंबई उत्तर बोरिवली 18 संध्या विपुल दोषी
2 मुंबई उत्तर दहिसर 1 रेखा राम यादव
3 मुंबई उत्तर दहिसर 6 दीक्षा हर्षद कारकर
4 मुंबई उत्तर दहिसर 4 मंगेश पांगारे
5 मुंबई उत्तर दहिसर 5 संजय शंकर घाडी
6 मुंबई उत्तर मागाठाणे 11 अदिती भास्कर खुरसुंगे
7 मुंबई उत्तर मागाठाणे 12 सुवर्णा गवस
8 मुंबई उत्तर कांदिवली पूर्व 28 वृषाली सुरेश हुंडारे
9 मुंबई उत्तर चारकोप 32 मनाली भंडारी
10 मुंबई उत्तर मालाड पश्चिम 34 विजय महाडिक
11 मुंबई उत्तर मालाड पश्चिम 48 सलमा सलीम आलमेकर
12 मुंबई उत्तर पश्चिम जोगेश्वरी पूर्व 53 अशोक खांडवे
13 मुंबई उत्तर पश्चिम जोगेश्वरी पूर्व 73 दीप्ती वायकर
14 मुंबई उत्तर पश्चिम जोगेश्वरी पूर्व 77 प्रियंका आंबोळकर
15 मुंबई उत्तर पश्चिम जोगेश्वरी पूर्व 78 नाजिया सोफी
16 मुंबई उत्तर पश्चिम जोगेश्वरी पूर्व 38 रिषिता आत्माराम चाचे
17 मुंबई उत्तर पश्चिम दिंडोशी 39 विनया विष्णू सावंत
18 मुंबई उत्तर पश्चिम दिंडोशी 41 मानसी दिलीप पावसकर
19 मुंबई उत्तर पश्चिम दिंडोशी 42 धनश्री वैभव भराडकर
20 मुंबई उत्तर पश्चिम गोरेगाव 51 वर्षा टेम्बवलकर
21 मुंबई उत्तर पश्चिम वर्सोवा 61 राजुल पटेल
22 मुंबई उत्तर पश्चिम वर्सोवा 62 राजू श्रीपाद पेडणेकर
23 मुंबई उत्तर पश्चिम वर्सोवा 79 सायली परब
24 मुंबई उत्तर पश्चिम अंधेरी पूर्व 86 रितेश राय
25 मुंबई उत्तर पश्चिम अंधेरी पूर्व 121 प्रतिमा खोपडे
26 मुंबई ईशान्य विक्रोळी 117 सुवर्णा सहदेव करंजे
27 मुंबई ईशान्य विक्रोळी 118 तेजस्वी गाडे
28 मुंबई ईशान्य विक्रोळी 119 राजेश सोनावणे
29 मुंबई ईशान्य विक्रोळी 120 राजराजेश्वरी अनिल रेडकर
30 मुंबई ईशान्य भांडुप पश्चिम 109 राजश्री मांडविलकर
31 मुंबई ईशान्य भांडुप पश्चिम 113 रुपेश अशोक पाटील
32 मुंबई ईशान्य भांडुप पश्चिम 114 सुप्रिया धुरत
33 मुंबई ईशान्य घाटकोपर पश्चिम 124 ज्योती हारून खान
34 मुंबई ईशान्य घाटकोपर पश्चिम 128 अश्विनी दीपकबाबा हांडे
35 मुंबई ईशान्य घाटकोपर पूर्व 125 सुरेश आवळे
36 मुंबई ईशान्य घाटकोपर पूर्व 133 श्रुतिका (निर्मिती) कानडे
37 मुंबई ईशान्य मानखुर्द शिवाजी नगर 134 समीरा अनिस कुरेशी
38 मुंबई ईशान्य मानखुर्द शिवाजी नगर 136 निजाम जैनुद्दीन शेख
39 मुंबई ईशान्य मानखुर्द शिवाजी नगर 137 आयेशा रफिक शेख
40 मुंबई ईशान्य मानखुर्द शिवाजी नगर 138 अमोल आंबेकर
41 मुंबई ईशान्य मानखुर्द शिवाजी नगर 139 जरीना अख्तर कुरेशी
42 मुंबई ईशान्य मानखुर्द शिवाजी नगर 140 सोनाली संजय जाधव
43 मुंबई उत्तर मध्य विलेपार्ले 83 निधी सावंत
44 मुंबई उत्तर मध्य विलेपार्ले 156 अश्विनी अशोक माटेकर
45 मुंबई उत्तर मध्य विलेपार्ले 160 किरण ज्योतीराम लांडगे
46 मुंबई उत्तर मध्य चांदिवली 161 विजयेंद्र ओंकार शिंदे
47 मुंबई उत्तर मध्य चांदिवली 162 वाजिद वाहिद कुरेशी
48 मुंबई उत्तर मध्य चांदिवली 163 शैला दिलीप लांडे
49 मुंबई उत्तर मध्य चांदिवली 169 जय मंगेश कुडाळकर
50 मुंबई उत्तर मध्य कुर्ला (SC) 171 सान्वी विजय तांडेल
51 मुंबई उत्तर मध्य कुर्ला (SC) 89 राजेश प्रकाश नाईक
52 मुंबई उत्तर मध्य कलिना 91 सगुन नाईक
53 मुंबई उत्तर मध्य कलिना 166 संजय रामचंद्र तुर्डे
54 मुंबई उत्तर मध्य कलिना 92 सलीम कुरेशी
55 मुंबई उत्तर मध्य वांद्रे पूर्व 93 सुमित वाजळे
56 मुंबई उत्तर मध्य वांद्रे पूर्व 94 पल्लवी कुणाल सरमळकर
57 मुंबई उत्तर मध्य वांद्रे पूर्व 96 तिभा तन्वीर शेख
58 मुंबई दक्षिण मध्य अणुशक्ती नगर 142 अपेक्षा गोपाळ खांडेकर
59 मुंबई दक्षिण मध्य अणुशक्ती नगर 143 शोभा जायभाये
60 मुंबई दक्षिण मध्य अणुशक्ती नगर 145 दीपक माहेश्वरी
61 मुंबई दक्षिण मध्य अणुशक्ती नगर 146 समृद्धी गणेश काते
62 मुंबई दक्षिण मध्य अणुशक्ती नगर 147 प्रज्ञा सुनील सदाफुले
63 मुंबई दक्षिण मध्य अणुशक्ती नगर 148 अंजली संजय नाईक
64 मुंबई दक्षिण मध्य चेंबूर 153 तन्वी काते
65 मुंबई दक्षिण मध्य चेंबूर 183 वैशाली नवीन शेवाळे
66 मुंबई दक्षिण मध्य चेंबूर 184 कोमल प्रवीण जैन
67 मुंबई दक्षिण मध्य धारावी (SC) 187 वकील शेख
68 मुंबई दक्षिण मध्य धारावी (SC) 188 भास्कर शेट्टी
69 मुंबई दक्षिण मध्य सायन कोळीवाडा 173 पूजा रामदास कांबळे
70 मुंबई दक्षिण मध्य सायन कोळीवाडा 175 मानसी मंगेश सातमकर
71 मुंबई दक्षिण मध्य सायन कोळीवाडा 179 शमा बी सरदार
72 मुंबई दक्षिण मध्य सायन कोळीवाडा 180 तृष्णा विश्वासराव
73 मुंबई दक्षिण मध्य सायन कोळीवाडा 181 पुष्पा कृष्णा कोळी
74 मुंबई दक्षिण मध्य वडाळा 178 अमेय अरुण घोले
75 मुंबई दक्षिण मध्य वडाळा 201 सुप्रिया सुनील मोरे
76 मुंबई दक्षिण मध्य माहीम 191 प्रिया गुरव-सरवणकर
77 मुंबई दक्षिण मध्य माहीम 192 प्रीती प्रकाश पाटणकर
78 मुंबई दक्षिण मध्य माहीम 194 समाधान सदा सरवणकर
79 मुंबई दक्षिण वरळी 193 प्रल्हाद वरळीकर
80 मुंबई दक्षिण वरळी 197 वनिता दत्ता नरवणकर
81 मुंबई दक्षिण वरळी 198 वंदना गवळी
82 मुंबई दक्षिण वरळी 199 रुपाली राजेश कुसळे
83 मुंबई दक्षिण वरळी 203 समिधा संदीप भालेकर
84 मुंबई दक्षिण शिवडी 204 अनिल कोकीळ
85 मुंबई दक्षिण शिवडी 206 नाना आंबोले
86 मुंबई दक्षिण भायखळा 208 विजय लिपारे
87 मुंबई दक्षिण भायखळा 209 यामिनी यशवंत जाधव
88 मुंबई दक्षिण मुंबादेवी 213 आशा मामेडी
89 मुंबई दक्षिण मुंबादेवी 223 प्रिया रुपेश पाटील
90 मुंबई दक्षिण कुलाबा 224 रुची वाडकर
91 मुंबई दक्षिण कुलाबा 225 सुजाता सानप

जागावाटपाचा फॉर्म्युला काय?

मुंबई महापालिकेसाठी सर्वच पक्षांच्या जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाले आहे. यासाठी महायुतीतील भाजप १३७ जागांवर, तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ९० जागांवर निवडणूक लढवत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मुंबईत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेत ६० ते ७० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर दुसरीकडे यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र आले असून, ठाकरे गट १६४ जागांवर तर मनसे ५३ जागांवर निवडणूक लढत आहे. त्यासोबतच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने हातमिळवणी केली असून काँग्रेसने १३९ तर वंचितने ६२ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.

अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट
अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट.
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?.
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?.
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?.
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन.
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा.
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन.
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?.
शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान
शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान.
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार.