छातीतून आरपार गेलेली दीड फूट सळई बाहेर काढली, रुग्णाचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार

बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या वरच्या मजल्यावरून पडलेली सुमारे दीड फूट लांबीची सळई एका 29 वर्षीय कामगार महिलेच्या छातीत आरपार घुसली होती.

छातीतून आरपार गेलेली दीड फूट सळई बाहेर काढली, रुग्णाचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार
Mayor Kishori Pednekar
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 7:56 PM

मुंबई : विक्रोळी पूर्व परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या वरच्या मजल्यावरून पडलेली सुमारे दीड फूट लांबीची सळई (कांब) खालच्या मजल्यावर काम करत असलेल्या एका 29 वर्षीय कामगार महिलेच्या छातीत आरपार घुसली होती. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी सलग तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेदरम्यान अथक प्रयत्न करून महिलेच्या छातीतील सळई कौशल्यपूर्वक काढून सदर महिलेचा जीव वाचवला होता. सध्यस्थितीत सदर महिलेला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनात ही अत्यंत अवघड कामगिरी यशस्वीपणे पार पाडणारे सहयोगी प्राध्यापक व युनिट प्रमुख डॉ. रणजीत कांबळे यांच्यासह संबंधित परिचारिका, वॉर्डबॉय इत्यादी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज (5 जुलै) पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. यावेळी आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल, नगरसेविका पुष्पा कोळी, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, डॉ. इंगळे तसेच संबंधित डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (BMC Lokmanya hospital save the life of labor women of Vikroli accident, now Doctors and staff felicitated by the Mayor)

महापौर किशोरी पेडणेकर उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांची संपूर्ण टीम, परिचारिका, वॉर्डबॉय हे सर्व अभिनंदनास पात्र आहेत. माझे दहावीपर्यंत शिक्षण बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये झाले असल्यामुळे मला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयाचा अत्यंत गौरव, अभिमान आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनीही या डॉक्टर व त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले असून आज या कौतुक सोहळ्याला मला उपस्थित राहता आले, भरपूर वेळ देता आला, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. संबंधित रुग्णाला बघितल्यानंतर आपल्याला भिती वाटेल अशी ही अवघड शस्त्रक्रिया आपण सर्वांनी यशस्वी करून दाखविली आहे. गरीब रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या माणुसकीचा संगम फक्त आपल्याकडेच बघायला मिळतो. तुमच्या या वैद्यकीय सेवेच्या संपूर्ण कार्याला माझा सलाम असल्याचे महापौरांनी सांगितले.

आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या संपूर्ण टीमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कठीण शस्त्रक्रिया होऊनही ही महिला चांगली होऊन घरी परतली आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आरोग्य समिती अध्यक्षा झाल्यानंतर मला कोव्हिड काळात तसेच सद्यस्थितीतही भरपूर काही शिकता आले. तसेच या संपूर्ण टीमचे मला अभिनंदन करण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

नेमकी घटना काय?

19 जून 2021 रोजी विक्रोळी पूर्व परिसरात निर्माणाधीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. या ठिकाणी एक पती-पत्नी कामगार म्हणून कार्यरत आहेत. यातील कामगार असणारी महिला खालच्या मजल्यावर आपले नेमून दिलेले बांधकाम विषयक काम करीत होती. हे काम करत असतानाच साधारणपणे दुपारी 3 वाजताच्या सुमारास वरच्या मजल्यावरून एक सळई पडली. ही सळई दुर्दैवाने महिलेच्या छातीत आरपार घुसली. त्यानंतर या अत्यंत गंभीर अवस्थेतील महिलेला तात्काळ महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचारानंतर सदर महिलेची गंभीर परिस्थिती बघून तिला शीव परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्याच लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास हलविण्यात आले.

‘बेड’वर झोपवणेही शक्य होत नसताना यशस्वी शस्त्रक्रिया

या महिलेची असलेली अत्यंत गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या महिलेच्या छातीत सळई आरपार घुसलेली असल्यामुळे या महिलेला शस्त्रक्रिया गृहातील (Operation Theatre) ‘बेड’वर झोपवणेही शक्य होत नव्हते. बऱ्याच प्रयत्नानंतर या महिलेस एका कुशीवर झोपवून ही शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात आली. साधारणपणे सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास सुरू झालेली ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया रात्री 10 वाजेपर्यंत म्हणजेच सलग 3 तास सुरू होती.

12 व्यक्तींच्या वैद्यकीय पथकाकडून सलग 3 तास शस्त्रक्रिया

या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयातील 3 विभागांतील तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांचा समावेश असलेली 12 व्यक्तींचं वैद्यकीय पथक अथकपणे कार्यरत होती. ही घटना घडली, त्याच दिवशी रात्री 10 वाजताच्या सुमारास अत्यंत अवघड शस्त्रक्रिया पूर्ण झाली आणि महिलेच्या छातीतून सळई यशस्वीपणे काढली. त्यामुळे महिलेचे प्राण वाचविण्यात यश आलं. आता घटनेच्या एका आठवड्यानंतर महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

वैद्यकीय पथकात कुणाचा समावेश?

ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणाऱ्या पथकामध्ये शल्यक्रिया विभागातील डॉक्टर विनीत कुमार, डॉक्टर रणजीत कांबळे, डॉक्टर पार्थ पटेल; हृदयशस्त्रक्रिया विभागातील डॉक्टर कुंतल सुराणा, भूलतज्ज्ञ डॉक्टर तेजस्विनी जांबोटकर यांच्यासह डॉक्टर अमेय, डॉक्टर प्राजक्ता आणि परिचारिका श्रीमती तेजस्विनी गायकवाड आणि सहाय्यक भास्कर लहानगे यांचा समावेश होता, अशीही माहिती शल्यक्रिया विभागाचे प्रमुख तथा अधिष्‍ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी दिली.

या शस्त्रक्रियेत समर्पित भावनेने काम करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाचे आणि संबंधित परिचारिका, वॉर्डबॉय इत्यादी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी आणि उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) देविदास क्षीरसागर यांनी कौतुक केले आहे. तसेच या पथकाला चमूला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व प्रमुख रुग्णालये ही अनेक गरजूंसाठी नवजीवन देणारी रुग्णालये असल्याची बाब नुकतीच पुन्हा एकदा या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.

इतर बातम्या 

Job News:मुंबई महानगरपालिकेत सहायक आयुक्त, अधिष्ठाता संवर्गासाठी पदभरती, MPSC द्वारे होणार प्रक्रिया

मुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’

(BMC Lokmanya hospital save the life of labor women of Vikroli accident, now Doctors and staff felicitated by the Mayor)

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.