AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे बीएमसी अलर्टवर, वांद्र्यात 650 जणांना दंड, 145 कॅफे अँड बारवर गुन्हे

दोन दिवसांपासून महापालिकेकडून रेस्टॉरंट्स, बार आणि हॉटेल्सवर धडक कारवाई केली जात आहे.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे बीएमसी अलर्टवर, वांद्र्यात 650 जणांना दंड, 145 कॅफे अँड बारवर गुन्हे
corona Update
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Feb 21, 2021 | 7:06 AM
Share

मुंबई : मुंबईसोबतच महराष्ट्राच्या इतर अनेक भागात वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे मुंबई महापालिका (BMC Raids On Hotels And Bars) अलर्ट झाली आहे. म्हणून दोन दिवसांपासून महापालिकेकडून रेस्टॉरंट्स, बार आणि हॉटेल्सवर धडक कारवाई केली जात आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास वांद्रे आणि खार परिसरातल्या पाच रेस्टॉरंन्ट, बार आणि पबवर कारवाई करण्यात आली आहे (BMC Raids On Hotels And Bars).

650 जणांवर दंडात्मक कारवाई

यात जवळपास 650 जणांकडून महापालिकेने 1 लाखापेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. वांद्रे येथील 145 कॅफे अँड बारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम पालळा गेला नाही. म्हणून सदर व्यवस्थापनावर संसर्गजन्य रोग प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत वांद्रे पोलीस ठाण्यात एच वॉर्डच्या आरोग्य खात्यामार्फत या कॅफे अँड बारवर 188, 269 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

त्याचसोबत वांद्र्यातील आयरिश हाऊस, खार स्टेशनजवळील क्वॉर्टर पिलर, थ्री वाईस मंकी आणि यू-टर्न लाऊन्जमध्ये देखील महापालिकेकडून तपासणी करण्यात आली. ज्यात मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची पायमल्ली झालेली दिसली आणि विना मास्क असलेले ग्राहक आढळले होते. त्यामुळे त्यांच्यावर मनपाकडून दंडात्मक कारवाई केली गेली आहे (BMC Raids On Hotels And Bars).

मुंबईच्या अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे पालिकेकडूनही वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई सुरु आहे. सर्वसामान्य लोकांनी सावध राहावे नियमांचे पालन करावे, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.

BMC Raids On Hotels And Bars

संबंधित बातम्या :

मोठी बातमी : राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे संकेत

दिल्लीतून महाराष्ट्रात कोरोना पाठवला जातो का? नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

मुंबईतील ऑफिसच्या वेळा बदलणार? मुख्यमंत्री मोदींना म्हणतात, कायदा करा!

Corona Updates : महाराष्ट्रात कोरोना आलेख चढाच! दिवसभरात राज्यात 6 हजार 281 रुग्णांची भर, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Follow Us
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी