Corona Updates : महाराष्ट्रात कोरोना आलेख चढाच! दिवसभरात राज्यात 6 हजार 281 रुग्णांची भर, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

शनिवारी दिवसभराचा आढावा घ्यायचा झाल्यास, राज्यात 6 हजार 281 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात 2 हजार 567 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Corona Updates : महाराष्ट्रात कोरोना आलेख चढाच! दिवसभरात राज्यात 6 हजार 281 रुग्णांची भर, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
Mumbai Corona Update

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा आलेख वाढताना पाहायला मिळतोय. त्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारीचे उपाय म्हणून निर्बंध कडक करण्याकडे कल वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केलाय. तर कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. शनिवारी दिवसभराचा आढावा घ्यायचा झाल्यास, राज्यात 6 हजार 281 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात 2 हजार 567 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात कोरोनामुळे 40 जणांचा मृत्यू झालाय.(increase of 6,281 corona patients per day in Maharashtra on 20th February)

राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पाहिलं तर आतापर्यंत एकूण 19 लाख 92 हजार 530 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. हे प्रमाण 95.16 टक्के इतकं आहे. तर राज्यातील मृत्यूदर हा 2.46 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५६ लाख ५२ हजार ७४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ९३ हजार ९१३ (१३.३८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 28 हजार 60 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1 हजार 610 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

जिल्हा आणि महानगरपालिका निहाय रुग्णवाढ (20 फेब्रुवारी 2021)

मुंबई महानगरपालिका – 897 ठाणे – 73 ठाणे मनपा – 147 नवी मुंबई मनपा – 116 कल्याण डोंबिवली मनपा -145 उल्हासनगर मनपा – 13 भिवंडी निजामपूर मनपा – 1 मीरा भाईंदर मनपा – 56 पालघर – 15 वसई विरार मनपा – 30 रायगड – 34 पनवेल मनपा – 55 नाशिक – 87 नाशिक मनपा – 189 मालेगाव मनपा – 16 अहमदनगर – 100 अहमदनगर मनपा – 36 धुळे – 10 धुळे मनपा- 31 जळगाव – 29 जळगाव मनपा – 70 नंदूरबार – 3 पुणे – 228 पुणे मनपा – 430 पिंपरी चिंचवड मनपा – 189 सोलापूर – 59 सोलापूर मनपा – 20 सातारा – 72 कोल्हापूर – 10 कोल्हापूर मनपा – 8 सांगली – 8 सांगली मिरज कुपवाड मनपा – 7 सिंधुदुर्ग – 1 रत्नागिरी – 74 औरंगाबाद – 18 औरंगाबाद मनपा – 160 जालना – 62 हिंगोली – 28 परभणी – 1 परभणी मनपा – 17 लातूर – 15 लातूर मनपा – 12 उस्मानाबाद – 16 बीड – 58 नांदेड – 18 नांदेड मनपा – 8 अकोला – 81 अकोला मनपा – 267 अमरावती – 249 अमरावती मनपा – 806 यवतमाळ – 92 बुलडाणा – 139 वाशिम – 92 नागपूर – 169 नागपूर मनपा – 548 वर्धा – 112 भंडारा- 20 गोंदिया – 5 चंद्रपूर – 13 चंद्रपूर मनपा – 14 गडचिरोली – 2

संबंधित बातम्या :

नवी मुंबईकरांनो सावधान! फेब्रुवारीत 2110 कोरोना रुग्णांची वाढ

मोठी बातमी : राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे संकेत

increase of 6,281 corona patients per day in Maharashtra on 20th February

Published On - 8:37 pm, Sat, 20 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI