AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीतून महाराष्ट्रात कोरोना पाठवला जातो का? नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर कोरोना साथीरोगाच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केलाय.

दिल्लीतून महाराष्ट्रात कोरोना पाठवला जातो का? नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
| Updated on: Feb 20, 2021 | 6:16 PM
Share

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर कोरोना साथीरोगाच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केलाय. भाजप नेते भांबावले असून ते कोरोनावर राजकारण करत आहेत. उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिसत नाही, मग दिल्लीतून कोरोना महाराष्ट्रात पाठवला जातोय का? असा सवालही नाना पटोले यांनी विचारला (Nana Patole criticize BJP over politics on Corona in Maharashtra).

नाना पटोले म्हणाले, “जनतेच्या आरोग्य सुविधाबाबत सरकार सकारात्मक आहे. मग भाजप का राजकारण करते? उत्तर प्रदेश, गुजरात या मोठ्या राज्यांमध्ये संख्या दिसतच नाही. दिल्लीतून कोरोना महाराष्ट्रात पाठवला जातो का? हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. या कोरोणावर राजकारण करू नका. भाजप नेते भांबावले आहेत.”

“डिझेल-पेट्रोलच्या महागाईवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजपकडून इतर प्रश्न उपस्थित”

“डिझेल पेट्रोल महाग झालाय. त्या मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी भाजप इतर प्रश्न उपस्थित करत आहे. जे टीका करतात त्यांना गुजराती समाज आपल्या खिशात आहे असं वाटतंय. आमच्या गुजराती सेलचा मेळावा होता. देशात गुजराती समाजाचं काम कसं सुरू आहे. त्याबाबत मेळावा होता, पण हाच समाज त्यांना धडा शिकवीन,” असं नाना पटोले यांनी सांगितलं.

“स्थानिक आघाडीबाबत स्थानिक कार्यकर्त्यांना विचारावं लागेल”

“महाविकास आघाडीचा उद्देश भाजपला दूर ठेवणे हा होता. भाजपला दूर ठेवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. स्थानिक आघाडीबाबत स्थानिक कार्यकर्त्यांना विचारावं लागेल,” असं म्हणत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आघाडीवरील चेंडू पटोले यांनी कार्यकर्त्यांकडे टोलावला आहे.

“देशापेक्षा कोणी मोठं नसतं”

नाना पटोले म्हणाले, “देशाची सुरक्षा धोक्यात आलीय. देशापेक्षा कोणी मोठं नसतं. भाजप देशाचं वस्त्रहरण करत आहे. देश विकायला निघाले आहेत. भाजपवाले काहीही बोलत आहेत. चंद्रकांत पाटील काहीही बोलतात. त्यांना काहीही बोलायचा अधिकार आहे.”

“भाजप घुसखोरांना पक्षाचा पदाधिकारी कसं करतं?”

“उत्तर मुंबईचा भाजप अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष बांगलादेशी घुसखोर आहे. त्याचं नाव रुबल शेख असून त्याच्याविरोधात पनवेलमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. गायीचं मास निर्यात करण्याची टोळी पकडली, त्यातही भाजपचे पदाधिकारी सापडले. अमित शाह यांना थेट प्रश्न आहे, की भाजपकडे आलेला वाल्या वाल्मिकी होतो आणि दुसऱ्याकडे तो देशद्रोह हा काय प्रकार आहे? तुम्ही घुसखोरांना पक्षाचे पदाधिकारी का करतात याचा विचार करा,” असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा : 

‘झुंड’वरुन झुंज, बिग बींकडून सिनेमाची तारीख जाहीर, नाना पटोलेंकडून आंदोलनाची घोषणा

‘सकाळी आयसोलेशन, रात्री सेलिब्रेशन’, नानाच्या नाना तऱ्हा; भाजपची पटोलेंवर टीका

‘…तर भाजप नेत्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय?’ नाना पटोलेंचा फडणवीसांना उद्देशून सवाल

व्हिडीओ पाहा :

Nana Patole criticize BJP over politics on Corona in Maharashtra

एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.