AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fit Mumbai: फिट इंडिया मिशन अंतर्गत ‘फिट मुंबई’ अभियानाची सुरुवात

Fit Mumbai: बृहन्मुंबई महानगरपालिकेने 25 ऑक्टोबर 2025 रोजी आयुक्त भूषण गगरानी, उपआयुक्त विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली बांद्रा किल्ला (Bandstand Heritage Precinct) या ऐतिहासिक परिसरात “फिट मुंबई” अभियानाची सुरुवात केली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Fit Mumbai: फिट इंडिया मिशन अंतर्गत 'फिट मुंबई' अभियानाची सुरुवात
Fit Mumbai
| Edited By: | Updated on: Dec 01, 2025 | 2:17 PM
Share

बृहन्मुंबई महानगरपालिकेने 25 ऑक्टोबर 2025 रोजी आयुक्त भूषण गगरानी, उपआयुक्त विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली बांद्रा किल्ला (Bandstand Heritage Precinct) या ऐतिहासिक परिसरात “फिट मुंबई” अभियानाची सुरुवात केली. “Fitness Dil Se!” ही या अभियानाचे ब्रीदवाक्य आहे. प्रत्येक मुंबईकराच्या फिटनेस प्रवासाला नवीन दिशा देत, नगरपालिकेने मुंबई कोस्टल रोड या स्थापत्य चमत्काराच्या किनारी जागतिक दर्जाचा सायकलिंग ट्रॅक आणि नयनरम्य रनिंग प्रोमेनेड अशी उत्कृष्ट सोयी निर्माण केल्या आहेत.

या अत्याधुनिक आणि प्रतीकात्मक अधोसंरचनेचा गौरव सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि राज्यापासून राष्ट्र, तसेच स्थानिक ते जागतिक स्तरावर फिटनेसचा संदेश प्रसारित करण्याच्या उद्देशाने एल अँड टी – बीएमसी कोस्टल रोड हाफ मॅराथॉन चे आयोजन करण्यात येत आहे. हा उपक्रम भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India) आणि फिट इंडिया मूव्हमेंट यांच्या प्रतिष्ठित तत्वावधानाखाली पार पडणार असून, त्याचे व्यवस्थापन लोहा फाउंडेशन द्वारे केले जाणार आहे.

हा वार्षिक फिटनेस महोत्सव दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी, आयोजित केला जाईल. याती पहिली आवृत्ती 14 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. तर चला — मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगातील नागरिकहो… या नव्या फिटनेसच्या पहाटेचे साक्षीदार बना! आरोग्य, ऐक्य आणि मानवतेच्या भावनेचा उत्सव साजरा करा…

“फिटनेस दिल से!” “फिट भारत प्रभावी भारत !!”

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.