कोरोना रोखण्यासाठी मुंबईतील वॉर्ड वॉर रुम सक्रिय करा, शिक्षकांचीही मदत घ्या; पालिका आयुक्तांचे आदेश

मुंबईत कोरोनाचा कहर झाल्याने कोरोना रोखण्यासाठी मुंबईतील वॉर्ड रुम सक्रिय करण्यात येणार आहेत. (BMC's new order for allocation of Covid beds in hospitals)

कोरोना रोखण्यासाठी मुंबईतील वॉर्ड वॉर रुम सक्रिय करा, शिक्षकांचीही मदत घ्या; पालिका आयुक्तांचे आदेश
bmc

मुंबई: मुंबईत कोरोनाचा कहर झाल्याने कोरोना रोखण्यासाठी मुंबईतील वॉर्ड रुम सक्रिय करण्यात येणार आहेत. तसेच त्यासाठी शिक्षकांची मदत घेण्याचे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आज दिले आहेत. (BMC’s new order for allocation of Covid beds in hospitals)

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी वॉर्ड वॉर रुम पुन्हा सक्रिय करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वॉर्ड रुमला कळविल्याशिवाय थेट बेड देता येणार नाहीत. कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता बेड अॅलॉटमेंट सिस्टिम वॉर्ड रुमच्या माध्यमातूनच होणार आहे. सरकारी रुग्णालये, खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम या ठिकाणी लक्षण नसलेल्या आणि कोणतेही दीर्घकालीन आजार नसलेल्या कोविड पेशंटला सरसकट बेड देऊ नये, अशा सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. तसेच वॉर्ड वॉर रुममधून रुग्णखाटांची उपलब्धता करून देण्यासाठी शिक्षकांची मदत घेण्यात यावी, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेड आणि 100 टक्के आयसीयू बडे महापालिकेच्या ताब्यात आहेत.

मुंबईत कोरोना वाढतोय

मुंबईत काल दिवसभरात 5 हजार 888 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 561 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 8 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांपैकी 7 पुरुष तर 5 महिलांचा समावेश आहे. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णाचा दर 85 टक्क्यांवर आलाय. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 53 दिवसांवर आला आहे.

धारावी, माहीम, दादरला विळखा

गेल्या आठ दिवसांपासून धारावी, माहीम आणि दादरमध्ये कोरोनाचा प्रचंड कहर वाढला आहे. काल धारावीत 64 रुग्ण आढळले असून धारावीतील रुग्णसंख्या 4834 झाली आहे. तर दादरमध्ये 83 रुग्ण सापडल्याने दादरमधील रुग्णसंख्या 5936वर पोहोचली आहे. तसेच माहीममध्ये 98 रुग्ण आढळल्याने माहीममधील रुग्णसंख्या 6034 झाली आहे. काल दिवसभरात दादर, धारावी, माहीममध्ये मिळून एकूण 245 रुग्ण सापडल्याने या परिसरातील रुग्णसंख्या 16804वर पोहोचल्याने आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

राज्याची परिस्थिती काय?

राज्यात काल गेल्या 24 तासांत 31 हजार 643 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 20 हजार 854 जण कोरोनामुक्त झाले आहेत. काल दिवसभरात 102 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. दरम्यान, काल कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसत आहे. कालच्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 कोटी 74 लाख 5 हजार 518 झाली आहे. त्यातील 2 कोटी 35 लाख 3 हजार 307 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 36 हजार 584 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर एकूण 54 हजार 283 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (BMC’s new order for allocation of Covid beds in hospitals)

संबंधित बातम्या:

Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात दिवसभरात 31 हजार 643 नवे रुग्ण, 102 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

सर्व खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव, बेड तुटवड्यानंतर पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय

Maharashtra lockdown update : अखेर मुख्यमंत्र्यांचा आदेश, लॉकडाऊनबाबत नियोजन करण्याचे निर्देश

(BMC’s new order for allocation of Covid beds in hospitals)

Published On - 11:38 am, Tue, 30 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI