AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलाच्या हव्यासापायी चार महिन्यांच्या लेकीचा घेतला जीव, महिलेला जामीन मंजूर

पुन्हा मुलगी झाल्याने निराश होऊन अवघ्या चार महिन्यांच्या मुलीचा जीव घेतल्याचा आरोप एका महिलेवर लावण्यात आला होता. त्या महिलेला उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला .

मुलाच्या हव्यासापायी चार महिन्यांच्या लेकीचा घेतला जीव, महिलेला जामीन मंजूर
| Updated on: Nov 09, 2023 | 1:07 PM
Share

मुंबई | 9 नोव्हेंबर 2023 : गरोदर असणं, आई बनणं हा बहुतांश महिलांसाठी अतिशय आनंदाचा क्षण असतो. पण त्यातही अनेक महिलांना मुलगा हवा असतो. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, अशी काहींची समजूत असते. आजकाल मुलगा-मुलगी हा भेद कमी झाला असला तरी बऱ्याच जणांना मुलांची अपेक्षा असते. पहिली मुलगी झाली तर दुसरा तरी मुलगा असावा अशी अनेकांची सुप्त इच्छा असते.

असंच काहीसं प्रकरण मुंबईत घडलं. दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यावर मुलगा जन्माला यावी अशी अपेक्षा होती. पण पुन्हा मुलगी झाल्याने निराश होऊन अवघ्या चार महिन्यांच्या मुलीचा जीव घेतल्याचा आरोप एका महिलेवर लावण्यात आला होता. त्या महिलेला उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे. याचिकाकर्ती महिलेविरुद्धचे प्रकरण हे परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे. शिवाय, याप्रकरणी आरोप निश्चितीही झालेली नाही. त्यामुळे हा खटला पूर्णत्वास जाण्यासाठी अजून बराच वेळ लागू शकतो.

तसेच आरोपी ही महिला असून ती एक वर्ष अकरा महिने या कालाधीपासून कारागृहातच आहे. तिची कोणतीही गुन्हेगारी पार्श्भूमी नाही. अशा परिस्थितीत याचिकाकर्ती महिलेला आणखी काही काळ कारागृहात ठेवले तर ते खटला चालवण्यापूर्वीच तिला शिक्षा सुनावण्यासारखे आहे. असे निरीक्षण न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठाने नोंदवले. आणि याचिकाकर्ती सपना मकदूम हिला जामीन मंजूर केला.

काय आहे प्रकरण ?

याचिकाकर्ती सपना मकदूम हिने तिची अवघी काही महिन्यांती मुलगी चोरीला गेल्याची तक्रार काळाचौकी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. नोव्हेंबर 2021 रोजी एक महिला जुन्या कपड्यांच्या मोबदल्यात भांडी विकण्यासाठी तिच्या घरी आली आणि मला बेशुद्ध करून चार महिन्यांच्या मुलीला घेऊन पसार झाली , असे त्या महिलेने पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांना तिच्यावर संशय आला आणि कसून चौकशी केली तेव्हा आपणच मुलीचा जीव घेतला याची कबुली तिने पोलिसांसमोर दिली. मला पहिली मुलगीच आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यावर मुलगा जन्माला यावा अशी अपेक्षा होती. पण पोटी पुन्हा मुलगीच आली. यामुळेच मी मुलीची हत्या केली, असे तिने पोलिसांसमोर कबूल केलं. पाण्याच्या टाकीत बुडवून तिचा जीव घेतल्याचे तिने सांगितले.

यानंतर पोलिसांनी तातडीने तिला अटक करून तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तेव्हापासून ती तुरूंगातच आहे. जामीनासाठी तिने सत्र न्यायालयात अर्ज केला होता, पण तेथे जामीन मिळाला नाही. अखेर तिने उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांनी तिला जामीन मंजूर केला.

Follow Us
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली
राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
Raj Thackeray UNCUT Speech | राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत मोठ्या...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी रावणाचा किस्सा सांगताच...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी किस्सा सांगिताच हशा पिकला, मेळाव्यातील लोकं...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले, न्यायप्रक्रियेतील गती...