Gujarati Banner Row : गुजराती भाषेत सूचना का? बोरिवलीत मराठी विरुद्ध गुजराती वाद पेटला, मनसेवाले मैदानात उतरले

Gujarati Banner Row : मुंबईत पुन्हा एकदा भाषिक वाद पहायला मिळतोय. गुजराती विरुद्ध मराठी असा हा वाद आहे. मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई हे एक बहुभाषिक शहर असलं तरी मराठी संस्कृती मुंबईची ओळख आहे.

Gujarati Banner Row : गुजराती भाषेत सूचना का? बोरिवलीत मराठी विरुद्ध गुजराती वाद पेटला, मनसेवाले मैदानात उतरले
Gujarati Banner Row
| Updated on: Oct 05, 2026 | 11:22 AM

मुंबईत पुन्हा एकदा गुजराती भाषेतील बॅनरवरुन वाद झालेला पहायला मिळतोय. बोरीवलीमध्ये गुजराती बॅनरवरून वाद झाला आहे. बोरीवलीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान समितीच्या वतीने हा गुजराती बॅनर लावण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या या बॅनरला विरोध केला जात आहे. या बॅनरमध्ये उद्यानात येणाऱ्या लोकांसाठीचे नियम हे गुजराती, मराठी आणि हिंदी अशा तीनही भाषांमध्ये लिहिण्यात आले आहेत, तरी देखील गुजराती भाषेत सूचना का? असा सवाल उपस्थित करत या बॅनरला विरोध केला जात आहे. मनसेने देखील बोरीवलीमध्ये गुजराती बॅनर लावून सूचना दिल्याबद्दल विरोध केला आहे.

“गुजरातीमध्ये यांनी बॅनर लावलेले आहेत ते आम्हाला मान्य नाहीत. ते आम्ही ठेवणार नाही. परत सूचना देतोय आम्ही, वाद पेटवू नका. आम्ही आमच्या स्टाइलने बॅनर फाडून टाकू. गुजरातमध्ये मराठी चालत नाही, मग इथे का जबरदस्ती करताय. स्वत:च वाद पेटवतायत. आम्ही मोठं आंदोलन करु. आम्ही सूचना केलेली आहे. अधिकारी आहेत, त्यांना सांगितलय गेटवरच नाव काढून टाका” असं मनसेच्या नेत्याने सांगितलं.

Loading...

गेट बघितले तर ते भाजपच्या रंगाने रंगवलेले आहेत

“गुजराती भाषेची गरजच काय? हिंदी, गुजराती भाषा कोणाला पाहिजे? आम्हाला नकोय, आम्हाला मराठी भाषा पाहिजे. आम्ही हे चालवून घेणार नाही” असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. “आम्ही बॅनर फाडून टाकले. जिथे-जिथे बॅनर दिसणार ते फाडून टाकणार. आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. आम्हाला तिन्ही भाषेतील बॅनर मान्य नाही. बॅनर काढले नाहीत, तर आम्ही आमच्या स्टाइलने काढू” असं मनसेकडून सांगण्यात आलं. “अजून इथे 10 ते 15 बॅनर आहेत ते काढून टाकू. जर, तुम्ही उत्तर मुंबईतले गेट बघितले तर ते भाजपच्या रंगाने रंगवलेले आहेत. महापालिका का कारवाई करत नाही? मनपा कोणाच्या दबावाखाली काम करतेय” असा सवाल मनसेकडून विचारण्यात आला. मुंबईत गुजराती विरुद्ध मराठी असा वाद सातत्याने होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us