Video:Boriwali मध्ये कुत्र्यांसोबत हैवानी कृत्य! जिवंत कुत्र्यांना भिंतीत गाडलं, भिंत फोडल्यावर धक्कादायक दृश्यं समोर
Boriwali Dogs stuck in Wall : बोरीवली पश्चिमेला असलेल्या एका इमारतीच्या जवळ रोज काही भटकी कुत्री दिसत होती. मात्र काही दिवसांपासून ही भटकी कुत्री गायब झाल्यानं प्राणी प्रेमी अस्वस्थ झाले होते.

मुंबई : कुत्रे, मांजर हे प्राणी मुंबईकरांसाठी घरातल्या (Pets in houses of Mumbai) एका कुटुंबासारखे असतात. हे प्राणी काही मुंबईकर फक्त घरातच पाळतात, अशातला भाग नाही. प्रत्येकाच्या परिसरात भटके कुत्रे, मांजरी यांनाही माया (Pets Love) लावली जाते. यातून एक वेगळं नात प्राणीप्रेमी आणि त्या-त्या जनावरांमध्ये निर्माण होतं. पण काही समाजकंटकांना भटकी जनावरं नेमकी का खुपतात, असा प्रश्न अनेकदा प्राणीप्रेमींकडून उपस्थित केला जातो. मुंबईतील पश्चिम उपनगरातल्या बोरीवलीतून (Boriwali West) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बोरीवलीत चक्क भिंतीच्या आत कुत्र्यांना गाडण्यात आलं. भटक्या कुत्र्यांना गाडण्यात आल्याचा हा प्रकार काही प्राणी प्रेमींनी उघडकीस आणला आहे. बोरीवली पश्चिमेला असलेल्या एका इमारतीच्या जवळ रोज काही भटकी कुत्री दिसत होती. मात्र काही दिवसांपासून ही भटकी कुत्री गायब झाल्यानं प्राणी प्रेमी अस्वस्थ झाले होते. अखेर या प्राणीप्रेमींनी शोध घेतल्यावर या जवळपास वीस ते बावीस कुत्र्यांना गाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नेमका हा प्रकार कुणी आणि का केला, याचा उलगडा होऊ शकलेला नाही. मात्र बोरीवलीच्या एमएचबी पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं कळलं कसं?
बोरीवलीतील लता कुलकर्णी या प्राणीप्रेमी महिलेनं हा सगळा प्रकार उघडकीस आणला आहे. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना अज्ञात इसमानं एका भिंतीच्या आत गाडलं होतं. बोरिवलीच्या विसी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पौर्णिमा शेट्टी दररोज जवळपास बोरिवली पश्चिमेत 300 भटक्या कुत्र्यांना आणि मांजरीला जेवण देतात. मात्र बोरीवलीच्या देविदास लेनवरील कुत्र्यांना जेवण देण्यासाठी त्या नेहमीप्रमाणे काल तिथं आल्या. तेव्हा त्यांना 20 ते 22 कुत्रा गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर पौर्णिमा यांनी आजूबाजूला पाहणी केली. यावेळी अँक्लीविरा ग्रँडच्या पार्किंगच्या बाजूच्या मोकळ्या जागेत भिंत रचून त्या कुत्र्यांना जिवंत गाडून टाकण्यात आल्याचं त्यांच्या निदर्शनास आलंय.
जिवंतच गाडलं!
बोरीवलीतील हे अमानवी कृत्य निदर्शनास आल्यानंतर प्राणीप्रेमी महिलांनी हातोडा घेऊन ही भिंत फोडली आणि आतमध्ये गाडल्या गेलेल्या कुत्र्यांना सुरक्षित बाहेर काढलं.
यावेळी भिंतीच्या आतमध्ये अगदी किरकोळ जागा होती. या जागेत अनेक कुत्र्यांना कोंडण्यात आलं होतं. कुत्र्यांना या ठिकाणी नीटशी उभं राहण्यासाठीही जागा नव्हती. भिंतीच्या पलिकडे पाईपावर या कुत्र्यांना सोडण्यात आलं होतं. या पाईपाच्या खाली खोलवर काहीच नव्हतं. भिंतीचे काही ब्लॉक तोडून आतमध्ये अडकेलल्या कुत्र्यांना अखेर जीवदान देण्यात आलं आहे.
याप्रकरणी प्राणीप्रेमी महिलांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. सध्या याप्रकरणी बोरीवलीच्या एमएचबी पोलिसांकडून अधिक तपास केला जातो आहेत. भटक्या जनावरांच्या जीवावर नेमकं कोण उठलं होतं, असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.
