सीएसएमटी स्टेशनजवळ पूल कोसळला, मृतांचा आकडा पाचवर पोहोचला

सीएसएमटी स्टेशनजवळ पूल कोसळला, मृतांचा आकडा पाचवर पोहोचला

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील पादचारी ब्रिजचा स्लब कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अंजुमन इस्लाम शाळेजवळील हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

मृतांची नावे

अपूर्वा प्रभू (35)

रंजना तांबे (40)

झहीद खान (32)

भक्ती शिंदे (40)

तपेंद्र सिंग (35)

पुलाचा स्लॅब कोसळल्यानंतर घटनास्थळी एकच धावाधावा झाली. संध्याकाळच्या वेळी सर्वजण ऑफिसवरुन घरी जाण्यासाठी निघत असतात. त्याचवेळी ही दुर्घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे या पुलाखालून नेहमी वाहनांची रहदारी सुरु असते. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पुलावरुन चालत असलेले लोकही खाली कोसळले, शिवाय खालीही अनेक जण उपस्थित होते. अधिकृतपणे दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. पण प्रत्यक्षदर्शीच्या मते, किमान पाच जण असे होते, ज्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

सायंकाळी सीएसएमटी स्टेशनला प्रचंड गर्दी असते. चाकरमानी दिवसभर काम करुन घराकडे निघालेली असतात. याच गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडली. मुंबई महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर हा पूल आहे.

पाहा व्हिडीओ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI