AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report : दिशा सालियानच्या मृत्यूबाबत सीबीआयचा अहवाल, नारायण राणे यांनी केलेले दावे खोटे?

ज्या दिशा सालियावरुन राणे कुटुंबियांनी ठाकरेंना टार्गेट केलं होतं, त्या दाव्यांना सीबीआच्या रिपोर्टनं खोटं ठरवलंय.

Special Report : दिशा सालियानच्या मृत्यूबाबत सीबीआयचा अहवाल, नारायण राणे यांनी केलेले दावे खोटे?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 23, 2022 | 11:00 PM
Share

मुंबई : दोन वर्षानंतर दिशा सालियानच्या मृत्यूबाबत सीबीआयनं अहवास दिलाय. त्या अहवालांमुळे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंवर उपस्थित केलेल्या दाव्यांवर प्रश्न उभे राहिले आहेत. म्हणून ठाकरे गट आता राणे पिता-पुत्रांकडून माफीची मागणी करतोय. ज्या दिशा सालियावरुन राणे कुटुंबियांनी ठाकरेंना टार्गेट केलं होतं, त्या दाव्यांना सीबीआच्या रिपोर्टनं खोटं ठरवलंय. बलात्कारानंतर दिशा सालियानची हत्या झाल्याचा दावा राणेंनी अनेकदा केला होता. या साऱ्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा गंभीर आरोपही राणेंचा होता. मात्र दिशा सालियानचा मृत्यू दारुच्या नशेत इमारतीवरुन तोल गेल्यामुळे झाला, असं सीबीआयनं अहवालात नमूद केलंय.

नारायण राणेंचा दुसरा आरोप होता की दिशा सालिया आणि सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूचं एकमेकांशी कनेक्शन होतं. मात्र सीबीआयच्या अहवालात तशी शक्यता देखील नाकारण्यात आलीय. त्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणेंनी याआधी जे आरोप केले होते, त्यावरुन ठाकरे गट आक्रमक झालाय.

महाराष्ट्रात सरकार बदलानंतर दिशा सालियानचे खरे आरोपी तुरुंगात जाणार, असा इशारा नारायण राणेंनी दिला होता. मात्र आता सीबीआयनंच दिशा सालियानचा मृत्यू तोल गेल्यामुळे झाल्याचा अहवाल दिलाय. त्यावर आधीच्या सरकारनंच पुरावे नष्ट केले असावेत, असं नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे म्हणतायत.

दिशा सालियान ही अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर होती. सुशांतसिह राजपूत वांद्रेत तर दिशा सालियान मालाडमध्ये राहायची. 8 जून 2020 ला दिशा सालियानचा इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. त्याच्या बरोब्बर 6 दिवसांनी म्हणजे 14 जून 2020 ला सुशांतसिंह राजपूतचाही मृत्यू झाला.

त्यामुळे या दोन्ही मृत्यूंमध्ये काहीतरी तार असल्याचा संशय वर्तवला गेला. त्याकाळी पोलिसांनी दिशा सालियानच्या मृत्यूला आत्महत्या ठरवलं होतं. मात्र आता सीबीआयनं दिशा सालियानच्या मृत्यूला अपघात ठरवलंय.

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयचा तपास अद्यापही सुरु आहे. आरोपांनुसार दिशा सालियानचा ज्यादिवशी मृत्यू झाला, त्यादिवशी तिच्या घरी पार्टीचं आयोजन होतं. त्याचदिवशी दिशा सालियानचा मृत्यू झाला. त्यामुळे इमारतीतलं सीसीटीव्ही, सोसायटीतली रजिस्टर वही गायब कशी झाली? यावर राणेंचं अद्यापही प्रश्नचिन्हं आहे.

Follow Us
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...