VIDEO: सव्वा दोन वर्षात मंत्रालयाकडे फिरकले नाहीत, कोणत्या निकषावर मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले?: चंद्रकांतदादा

गेल्या सव्वा दोन वर्षात मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात आले नाहीत. त्यांच्यासाठी महाराष्ट्र फक्त मुंबईत आहे. मग कशाच्या निकषावर ते पाच टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये आले?

VIDEO: सव्वा दोन वर्षात मंत्रालयाकडे फिरकले नाहीत, कोणत्या निकषावर मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले?: चंद्रकांतदादा
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 8:11 PM

मुंबई: गेल्या सव्वा दोन वर्षात मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे एकदाही मंत्रालयात आले नाहीत. त्यांच्यासाठी महाराष्ट्र फक्त मुंबईत आहे. मग कशाच्या निकषावर ते पाच टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये आले?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

‘इंडिया टुडे’ आणि ‘सी व्होटर’ने ‘मूड ऑफ द नेशन’ या आधारवर एक सर्व्हे केला आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशातील टॉपच्या मुख्यमंत्र्यांमध्ये स्थान मिळालं आहे. या यादीत उद्धव ठाकरे पाचव्या क्रमांकावर आहे. हा सर्व्हे जाहीर झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. कोणत्या निकषावर ते पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आले? कारण गेली सव्वा दोन वर्ष ते एकदाही मंत्रालयात आले नाहीत. ते लोकांसठी गेल्या 80-90 दिवसांपासून उपलब्ध नाहीत. पंतप्रधानांनी बोलावलेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीला ते उपस्थित नसतात आणि महापालिकेच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. कारण त्यांचा महाराष्ट्र फक्त मुंबई आहे. मुंबईबाहेर त्यांना महाराष्ट्र माहीत नाही अशा वेळी त्यांना पाचवा क्रमांक कसा मिळतो? असा सवाल करतानाच त्यांना क्रमांक मिळावा असेच निकष असतील असा चिमटाही पाटील यांनी काढला.

कोल्हे गोडसेशी सहमत आहेत का?

यावेळी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने त्यावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नथुराम गोडसे यांची भूमिका अमोल कोल्हे यांनी एक अभिनेता म्हणून करणे यात मला काही गैर आहे असं वाटत नाही. नथुराम गोडसेंच्या विचारांशी ते सहमत आहेत का ते त्यांनी जाहीर करावं. एक अभिनेता कुणाचीही भूमिका करू शकतो. उद्या अफझल खानाचीही भूमिका करू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

आमच्या सूचनांना केराची टोपली

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील वाढत्या कोरोना संदर्भात बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहण्याचा मानस व्यक्त केला. प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा प्रयत्न करेल. तसे शक्य न झाल्यास अजितदादांना पत्र लिहून सूचना करेल. शाळा सुरू कराव्यात आणि शाळा सुरू करण्यासाठीचे नियम नीट करावेत अशा सूचना पत्रात करणार आहे, असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत मी अजितदादांच्या बैठकांना जात नव्हतो. कारण सूचनांना केराची टोपली दाखवली जाते, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Utpal Parrikar : माझ्या पार्टीच्या ऑफर स्वीकारल्या नाही, इतरांच्या काय घेणार?; शिवसेना, आपच्या ऑफरवर उत्पल यांचा सवाल

आयुष्यात या 5 चुकांपासून स्वतःला दूर ठेवा, नाहीतर होऊ शकते नुकसान 

Maharashtra News Live Update : पर्रीकरांना पणजी हवी असल्यास ते शक्य नाही – देवेंद्र फडणवीस

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.