AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे”; विश्व मराठी साहित्य संमेलनात सीमावाद पुन्हा घुमला…

विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेचा गौरव करत जगभरात तिचा होत असलेला विकास हा अभिमानस्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.

बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे; विश्व मराठी साहित्य संमेलनात सीमावाद पुन्हा घुमला...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jan 04, 2023 | 3:27 PM
Share

मुंबईः भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची तीव्र भावना होती. मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा इतिहास हा संघर्षाचा आहे. आपल्या काही भाषिक बांधवांचा असा महाराष्ट्रात येण्यासाठीचा संघर्ष अजूनही सुरु आहे. त्यामुळे कर्नाटकातील मराठी भाषिकांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये दिला आहे.

यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या त्या केल्या जाणार आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बोलताना सांगितले की, गेल्या कित्येक वर्षापासून सीमावादाचा प्रश्न पडून होता. मात्र शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर सीमावादाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच या विषयावर चर्चा केली. त्यामुळे हा वाद लवकरच निकालात निघणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रथमच आमच्या सरकारव बरोबर चर्चा करून हा वाद सोडवण्याचा विश्वास दिला आहे. त्यामुळे भविष्यातही कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी जे जे करता येईल त्या त्या सर्व गोष्टी कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी केल्या जाणार असल्याचा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला.

विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेचा गौरव करत जगभरात तिचा होत असलेला विकास हा अभिमानस्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई ही महाराष्ट्र मिळवताना 106 हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. याची जाणीवही माझ्या मनात सातत्याने असते, त्यामुळे मुंबईत मराठी भाषेची, मराठी भाषिकांची पिछेहाट होणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?