AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून मिळालेल्या शाबासकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,…

राज्यपाल शिवनेरी, रायगड या किल्ल्यांवर स्वतः गेलेत. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून मिळालेल्या शाबासकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,...
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Dec 12, 2022 | 5:04 PM
Share

मुंबई : गुजरात निकालानं आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तसंच बाळासाहेबांच्या शिवसेनेला मोठं यश मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला आणि देवेंद्र फडणवीस यांना शाबासकी दिली. समृद्धी महामार्ग हा गेम चेंजर प्रकल्प आहे. राज्याचा हिताचा प्रकल्प आहे. त्यामुळं पंतप्रधान मोदी यांना ते काम आवडलं. समृद्धी महामार्गाचा प्रकल्प यशस्वीपणे आम्ही राबविला. म्हणून पंतप्रधानांनी शाबासकीची थाप पाठीवर मारली.

पंतप्रधानांच्या शाबासकीमुळं आनंद झाला. केलेल्या कामाचं समाधान आहे. शाबासकी मिळणं हे आमच्यासाठी गौरवाची बाब असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्यपाल असताना आपण पवित्र ठिकाणी व्यक्तिश: गेल्याचं कोश्यारी यांनी म्हटलं. आपली विधानं ही मोडतोड करून दाखविली जातात. त्याबाबत विरोधी पक्ष राजकारण करतोय, अशा भावना राज्यपालांनी पत्राद्वारे व्यक्त केल्यात. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यपाल शिवनेरी, रायगड या किल्ल्यांवर स्वतः गेलेत. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राज्यपाल कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहीलं. त्यात त्यांनी म्हटलं, माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी भांडवलं केलं. आधी महात्मा गांधीजी, पंडित नेहरुजी, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींना विद्यार्थी आदर्श मानत होतो. हे सारे आदर्श आहेतच. पण, युवा पिढीतील वर्तमानात आदर्श भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम, होमी भाभा हेसुद्धा कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श राहू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचासुद्धा आदर्श विद्यार्थ्यांसमोर राहू शकतो. याचा अर्थ महापुरुषांचा अवमान करणे असा होत नाही, असं कोश्यारी यांनी पत्रात म्हटलंय.

Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल