Uddhav Thackeray : बंडखोरांना भाजपात जाण्याशिवाय पर्याय नाही, उद्धव ठाकरेंनी बैठकीत संपूर्ण डाव सांगितला

मुंबईः हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी 56 वर्षापूर्वी ज्याप्रकारे शिवसेना स्थापन करण्यासाठी जो नारळ फोडला होता. त्यावेळ जी परिस्थिती होती, तशीच परिस्थिती आता आहे, त्यामुळे तसा प्रयत्न करा असं म्हणत, ज्यांना आपले भविष्य उज्ज्वल आहे, त्यांनी खुशाल शिवसेना (Shivsena) सोडूव जावी असं भावनिक उद्गगार काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांविषयी […]

Uddhav Thackeray : बंडखोरांना भाजपात जाण्याशिवाय पर्याय नाही, उद्धव ठाकरेंनी बैठकीत संपूर्ण डाव सांगितला
शिवसेनेत गद्दार शिवसैनिक नकोः उद्धव ठाकरे
Image Credit source: tv9 marathi
महादेव कांबळे

|

Jun 24, 2022 | 11:35 PM

मुंबईः हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी 56 वर्षापूर्वी ज्याप्रकारे शिवसेना स्थापन करण्यासाठी जो नारळ फोडला होता. त्यावेळ जी परिस्थिती होती, तशीच परिस्थिती आता आहे, त्यामुळे तसा प्रयत्न करा असं म्हणत, ज्यांना आपले भविष्य उज्ज्वल आहे, त्यांनी खुशाल शिवसेना (Shivsena) सोडूव जावी असं भावनिक उद्गगार काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांविषयी आणि सध्याच्या परिस्थितीविषयी आपले मत मांडले. ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे, त्यांना आता भाजपमध्ये गेल्याशिवायही पर्याय नाही असं सांगत त्यांनी गद्दार शिवसैनिक नकोत अशी टीका नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना सांधला.

मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी टप्प्या टप्प्याने आपल्याच पक्षाचे आमदार फोडत गेल्या चार पाच दिवसात त्यांनी बंडखोर आमदारांचा आकडा 56 वर नेऊन पोहचवला, तरीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलेल्या भाषणात ज्यांना जायचं आहे, त्यांनी खुशाल जावं असे सांगत फसवून न जाता त्यांनी उघडपणे जावे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

 आपल्याच माणसांनी पाठीत खंजीर खुपसला

विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्यामुळे ज्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत, त्या घडामोडींचा संदर्भ घेत उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, या काळात आपल्याच माणसांनी पाठीत खंजीर खुपसला आहे, त्यामुळे आता शिवसेनेत गद्दार नको असं सांगत जे आमदार बंडखोरी करून भाजपात गेले आहेत, ज्यांना डिसक्वॉलिफाय व्हायचे नसेल त्यांना आता भाजपात जाण्याशिवाय पर्यायच नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली आहे, ते आमदार आता पक्षाबाबत संभ्रम निर्माण करत आहेत, असंही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मतदार असणाऱ्या शिवसैनिकांविषयी सांगताना म्हणाले की, ज्यांनी निवडून दिले त्यांना तुम्ही कसं सांगणार असा सवालह त्यांनी यावेळी केला.

काही आमदार संपर्कात

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले आमदार, जे गुवाहाटीत गेले आहेत, त्यातील काही आमदार माझ्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकार अडचणीत आले असतानाही आणि बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबतचा प्रस्ताव परवा दिला होता, त्यावरही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट मत मांडत सांगितले की, भाजपसोबत जाण्यात  काय अर्थ आहे. त्यामुळे यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना स्टाईलने आपल्या शिवसैनिकांना त्यांनी जो संदेश द्यायचा आहे तो दिला आहे.

डिसक्वॉलिफाय आणि बंडखोर आमदार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला पदाचा मोह नाही असं सांगत असतानाच वर्षा सोडल्यावर त्यांनी ठामपणे आपल्याला पदाचा मोह नाही मात्र मी जिद्दही सोडली नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे शिवसेना हा पक्ष नाही तर विचार आहे असं सांगत त्यांनी शिवसैनिकांना सरकार अडचणीत असतानाही त्यांनी सरकार काही धोका नाही असा विश्वासही आपल्या भाषणातून त्यांनी दिला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना आता डिसक्वॉलिफायचा विषय समजून सांगत, त्यांना आता भाजपात गेल्याशिवाय पर्याय नाही असंही त्यांनी सांगितले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें