AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर हे असं आहे सर्वज्ञानी, चित्रा वाघ यांचा ठाकरे गटाच्या या नेत्यावर जोरदार हल्लाबोल, कारण काय?

ही चूक लक्षात येताच भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

तर हे असं आहे सर्वज्ञानी, चित्रा वाघ यांचा ठाकरे गटाच्या या नेत्यावर जोरदार हल्लाबोल, कारण काय?
चित्रा वाघ, भाजप नेत्या
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Dec 15, 2022 | 8:39 PM
Share

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झालाय. असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. तर, बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातल्या महू या गावात झाला. असं चित्रा वाघ यांनी सांगितलं. तर हे असं आहे सर्वज्ञानी यांचं अगाध ज्ञान असं म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. मीडियासोबत बोलताना संजय राऊत म्हणाले, विरोधी पक्षाचा आणि जनतेचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. असं घडू नये. पण, महाराष्ट्रामध्ये हे घडतंय. या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. बाबासाहेबांनी लोकशाही जन्माला घातली. त्या महाराष्ट्रात हे घडतंय, हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

ही चूक लक्षात येताच भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. चित्रा वाघ म्हणाल्या, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही. मध्य प्रदेशातील महू येथे झाला. इतक सामान्य ज्ञान असू नये. आमचे आदर्श असणारे बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवताय, असा सवालही चित्रा वाघ यांनी विचारला. रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील, याचं दर्शन आज महाराष्ट्राला झालं, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

अशा पद्धतीनं राष्ट्रपुरुषांचा अपमान तुम्ही करायचा. मोर्चेसुद्धा तुम्ही स्वतःच काढायचे. मूर्ख समजू नका. महाराष्ट्र तुम्हाला पुरता ओळखून आहे. तुमचा जाहीर निषेध, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना सुनावलं.

महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी पोलिसांनी परवानगी दिली. पण, अटी, शर्ती लावण्यात येत आहेत. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, हे मुद्दाम चाललेलं आहे. विरोधी पक्षाचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे.

महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी जाण्यापूर्वी हे विधान संजय राऊत यांनी केलं. कोर्टातून निघण्यासाठी उशीर झाला, असं म्हणून संजय राऊत बैठकीसाठी निघून गेले.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान