AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी हिंदूंना 15 वर्षांनंतर भारताचे नागरिकत्व, पाकिस्तानात होत असलेल्या अत्याचाराची काहणी सांगताना अश्रू अनावर

caa india citizenship: पाकिस्तानात अल्पसंख्याकांना सतत छळ, खंडणी, आणि धर्मांतराचा त्रास सहन करावा लागतो. हिंदू मुलींचं जबरदस्तीने धर्मांतर केले जाते. भारताच्या कुशीतच आपला धर्म सुरक्षित आहे. हिंदूंसाठी आता भारतात एक नवा संसार सुरू झाला आहे.

पाकिस्तानी हिंदूंना 15 वर्षांनंतर भारताचे नागरिकत्व, पाकिस्तानात होत असलेल्या अत्याचाराची काहणी सांगताना अश्रू अनावर
caa india citizenship
| Updated on: Aug 16, 2024 | 10:07 AM
Share

भारत आणि पाकिस्तान फळणीच्या जखमांवर फुंकर घालत पाकिस्तानातून आलेल्या 54 सिंधी हिंदूंनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर अखेर भारताच्या कुशीत आश्रय घेतला आहे. 15 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) माध्यमातून त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. उल्हासनगरातील सिंधी भवन येथे आयोजित कार्यक्रमात या नव भारतीयांनी कृतज्ञतेने आपल्या भावना व्यक्त करताना “आता आम्ही आणि आमचा धर्म भारत मातेच्या कुशीत सुरक्षित आहोत,” असे उद्गार काढले.

डोळ्यातून अश्रू वाहू लागले

राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद, महाराष्ट्र सिंधी साहित्य अकॅडमी, सिंधी कलाकार संगम, आणि उल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने “विभाजन विभाषिका स्मृती दिवस” सिंधी भवन येथे साजरा करण्यात आला. यावेळी नव भारतीयांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या पाकिस्तानातील अत्याचारांची कहाणी उलगडली गेली. “भारताच्या कुशीतच आपला धर्म सुरक्षित आहे,” असे सांगताना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

तीन महिन्यांत नागरिकत्व

प्रकाश देवानी, अनित कुमार आसानी आणि दिलीप हुंदलानी यांसारख्या नव भारतीयांनी पाकिस्तानातील जाचक जीवनाची कहाणी रेखाटली. त्यांनी सांगितलं की, “पाकिस्तानात अल्पसंख्याकांना सतत छळ, खंडणी, आणि धर्मांतराचा त्रास सहन करावा लागतो. हिंदू मुलींचं जबरदस्तीने धर्मांतर केले जाते.” भारतीय सिंधू सभा नावाच्या संघटनेने या सिंधी भाषिकांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले आहेत.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, नवीन CAA कायद्यामुळे गेल्या 10 ते 15 वर्षांपासून नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या 150 लोकांपैकी 54 जणांना केवळ तीन महिन्यांत नागरिकत्व मिळाले आहे. उर्वरित अर्ज प्रलंबित असून, त्यांनाही लवकरच भारतीय नागरिकत्व मिळण्याची आशा आहे. पाकिस्तानातील प्रतिकूल परिस्थितीतून सुटलेल्या या हिंदूंसाठी आता भारतात एक नवा संसार सुरू झाला आहे.

मोदी 2 सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संमत केले होते. या विधेयकातील तरतुदीनुसार बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील बिगरमुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारसी धर्मीयांना भारताचे नागरिकत्व दिले जाते. त्यांच्याकडे उचित कागदपत्रे नसली, तरी भारताचे नागरिकत्व मिळते.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.