AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : महादेवी परत येण्याचा मार्ग प्रशस्त; वनतारा सीईओसोबत चर्चा, मुख्यमंत्र्यांनीच दिली ती मोठी अपडेट

CM Devendra Fadnavis : महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठीचा मार्ग लवकरच मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनताराचे सीईओ यांच्यात बैठक झाली. त्यानंतर याविषयीची मोठी अपडेट समोर आली आहे. काय घडले त्या बैठकीत?

Devendra Fadnavis : महादेवी परत येण्याचा मार्ग प्रशस्त; वनतारा सीईओसोबत चर्चा, मुख्यमंत्र्यांनीच दिली ती मोठी अपडेट
महादेवी हत्तीण परत येणार
| Updated on: Aug 06, 2025 | 11:57 AM
Share

Mahadevi-Madhuri Elephant : महादेव हत्तीण (माधुरी) परत आणण्याविषयी कोल्हापुरात मोठे आंदोलन झाले. लोक रस्त्यावर उतरले. मोठा मोर्चा काढण्यात आला. विविध आजीमाजी लोकप्रतिनिधी ही आंदोलनात उतरले. त्यानंतर काल मुंबईत मंत्रालयात याविषयी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत हत्तीण परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी वनताराचे सीईओ यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे ही हत्तीण परत आणण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीच याविषयीची माहिती ट्विट करत सोशल मीडियावर दिली आहे.

काय झाली चर्चा

वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, वनताराने केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता, असे स्पष्ट केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

कालच्या बैठकीत काय निर्णय?

34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे. हत्तीण परत आली पाहिजे, ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. मठाने एक याचिका दाखल करावी आणि सोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल, अशी मोठी भूमिका मुख्यमंत्र्यांनी कालच्या मंत्रालयातील बैठकीत मांडली. हत्तीणाची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक टीम तयार करेल, आणि तसेच सुप्रीम कोर्टात ही भूमिका मांडेल. तिची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. रेसक्यू सेंटर, आहार याबाबतीत सुद्धा राज्य सरकार आपल्या याचिकेत सुप्रीम कोर्टाला आश्वस्त करेल. राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठाच्या सोबत आहे. माधुरी हत्तीण परत यावी यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले .

Follow Us
हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
ब्रेकिंग: हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले
Jalgaon | जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले; नद्यांना पूर
राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना...
Maharashtra Rain Alert | राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे...
Sanjay Raut Press | दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर खोचक निशाणा
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
Satara Koyna Dam | कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू रागाने लाल!
अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून..
Anil Parab | अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच बड्या नेत्याने केला खळबळजनक दावा