AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, आज दुपारी अमित शाहांची घेणार भेट, मोठ्या राजकीय घडामोडींना वेग

Eknath Shinde visit to Amit Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर आहेत. आताच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्ली दौरा केला होता. ते आज दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतील. राजधानीत काय राजकीय घडामोडी?

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, आज दुपारी अमित शाहांची घेणार भेट, मोठ्या राजकीय घडामोडींना वेग
एकनाथ शिंदे, अमित शाह
| Updated on: Aug 06, 2025 | 11:26 AM
Share

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी पोहचले आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी दिल्ली दौरा केला होता. आज ते दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतील. एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या राहत्या घरी दुपारी १ वाजता बैठक होणार आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेणार असल्याचे समजते. या बैठकीदरम्यान राज्यातील राजकारणावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राजकारणासह इतर मुद्दे

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि युतीतील जागा वाटपाबाबत तसेच शिवसेनेच्या नाराजीविषयी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय शिवसेनेच्या काही नेत्यांविषयीच्या नाराजीचा सूर ही निघू शकतो. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लक्षात घेता, त्याचीही चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर राज्यातील राजकारणात बदल होतात का? याची चर्चा सुरू आहे.

टीका करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं

उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीमध्ये आहेत ही वस्तुस्थिती आहे. पण ते कोणाला भेटणार याची मला कल्पना नाही परंतु दुसरी महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की जे शिंदे यांच्यावर दिल्ली आहेत मध्ये असल्यावर टीका करतात ती मंडळी देखीलच दिल्लीमध्ये आहेत आणि ते राहुलजी गांधीं बरोबर जेवणार आहे त, अशी सुद्धा बातमी आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना आत्म चिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जी UBT काँग्रेसच्या तालावर आणि काँग्रेसच्या आदेशावर दिल्ली बंद चालते त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची काही आवश्यकता नाही, असे मंत्री उदय सामंत म्हणाले. आज जर मी असं म्हटलं की पूर्ण UBT काँग्रेसच्या ध्येयधोरणावर आधारित आहेत आणि राहुल गांधी चालवतात तर ते योग्य ठरणार आहे का आणि म्हणून दुसऱ्यावर टीका करताना विचार करून केली पाहिजे, असा टोला सामंत यांनी लगावला.

ते काँग्रेसच्या तालावर नाचतात

भाजपाच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्यावेळी सरकारमध्ये काम करतो. आम्ही अलायन्समध्ये काम करतो. शिवसेना अलायन्समध्ये आहे. त्याच्यामुळे पंतप्रधानांकडून निधी आणणं ही आमची जबाबदारी आहे. पण सत्तेमध्ये नसताना महाविकास आघाडीमध्ये असताना काँग्रेसच्या तालावर नाचणं कितपत योग्य आहे, असा खोचक टोला त्यांनी उद्धव सेनेला लगावला आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेल्यानंतर टीका करणे थांबवलं पाहिजे आणि तुम्ही देखील आता तीन दिवस दिल्लीला जात आहे आणि काँग्रेस जे काय सांगेल ते महाराष्ट्र देऊन तुम्ही करणार आहात, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.