RBI Repo Rate : तुमचा EMI किती झाला कमी? ट्रम्प यांनी केला की काय खोळंबा? आरबीआयचा निर्णय काय?
RBI Repo Rate : या वर्षात आरबीआयने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. पतधोरण समितीने आतापर्यंत रेपो दरात 1 टक्क्यांची कपात केली आहे. जून महिन्यात व्याज दरात 0.50 टक्क्यांची कपात करण्यात आली होती. आता किती होणार ईएमआय कमी?

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटकडे सगळ्या ग्राहकांचे लक्ष लागलेले होते. फेब्रुवारी 2025 पासून आरबीआय पतधोरण समितीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. आतापर्यंत तीनदा व्याज दर कपात करण्यात आली आहे. पण यावेळी व्याज दर कपातीचा निर्णय झाला नाही. आरबीआयने जैसे थे परिस्थिती ठेवली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या टॅरिफ कार्ड खेळले आहे. त्याचा थेट परिणाम पतधोरण समितीच्या धोरणावर दिसून आला. आज 0.25 अथवा 0.50 आधार अंकांवर कपातीची अपेक्षा होती. पण ती फोल ठरली. यावेळी रेपो दरात कुठलाही बदल न करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. पतधोरण समितीने आतापर्यंत रेपो दरात 1 टक्क्यांची कपात केली आहे. जून महिन्यात व्याज दरात 0.50 टक्क्यांची कपात करण्यात आली होती.
रेपो दर जैसे थे
आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात कुठलाही बदल न करण्याचे जाहीर केले. त्यामुळे ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. दिवाळीपूर्वी आता जर रेपो दरात कपात झाली असती तर कार मार्केट आणि रिअल इस्टेट बाजारपेठेला मोठा फायदा झाला असता. पण आरबीआयने रेपो रेट 5.50 टक्के कायम ठेवला. नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या कार्यकाळात रेपो दरात 1 टक्क्यांची कपात झालेली आहे. यापूर्वी आरबीआय गव्हर्नर यांनी फेब्रुवारी महिन्यात रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली होती. एप्रिल महिन्यात आरबीआयने व्याज दरात 0.25 टक्के तर जून महिन्यात पतधोरण समितीच्या बैठकीत 0.50 टक्क्यांची मोठी कपात करण्यात आली होती. ग्राहकांना हा आश्चर्याचा मोठा धक्का होता. यावेळी कमीत कमी 0.25 टक्क्यांची कपात अपेक्षित होती.
महागाई नाही, मोठा दिलासा
जुलै महिन्यातील महागाईच्या आकड्यांनी सरकारचा जीव भांड्यात पडला आहे. पण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीसमोर जून महिन्याचे महागाईचे आकडे आहेत. जून महिन्यात किरकोळ महागाई जवळपास 77 महिन्यांच्या निच्चांकावर आली. पण ट्रम्प यांच्या टॅरिफ खेळीने आरबीआयसमोर व्याज दरात कपात करावी की नाही असा प्रश्न उभा ठाकला होता. टॅरिफ कार्डच्या दबावामुळेच आता व्याज दर कपात झाली नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
दर कपातीला ब्रेक
आरबीआयने 2025 पासून सुरू केलेल्या रेपो दर कपातीचे मिशन सुरूच आहे. यापूर्वी फेब्रुवारी आणि एप्रिल 2025 महिन्यात रेपो दरात 0.25-0.25 टक्के कपात करण्यात आली होती. त्यामुळे रेपो दर 6.50 वरून 6 टक्क्यांवर आला होता. आता त्यात 0.50 टक्क्यांची कपात झाल्याने रेपो दर 5.5 टक्क्यांवर आला आहे. पण यावेळी ऑगस्ट महिन्यात या दर कपात धोरणाला ब्रेक लावण्यात आला आहे.
