AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rain : पुराची भीती, अलर्ट राहा! मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश, मुख्य सचिवांशीही चर्चा, पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचे

CM Ekanth Shinde : मुंबईतील परिस्थितीवर देखील मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.

Maharashtra Rain : पुराची भीती, अलर्ट राहा! मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश, मुख्य सचिवांशीही चर्चा, पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचे
मुख्यमंत्र्यांचे निर्देशImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 05, 2022 | 9:34 AM
Share

मुंबई : हवामान खात्याने (Maharashtra Rain Alert) पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा (Rain Video) दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून एन डी आर एफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. वाढता पाऊस आणि पुराची शक्यता पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली. तसंच सबंधित पालक सचिवांना त्या त्या जिल्ह्यांमध्ये पोहचून प्रत्यक्ष देखरेख व नियंत्रण करण्याचे निर्देश दिले आहेत.

पाहा व्हिडीओ :

विशेषत: रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुंबई ऑरेंज अलर्ट

मुंबईतील परिस्थितीवर देखील मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे.

याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

थोडक्यात पण महत्त्वाचं

  1. कोकणासह राज्यात पुढील 5 दिवस दमदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय.. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या आणि मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. तर कोकणाती काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
  2. मुंबईसह उपनगरांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.. मुंबई उपनगरात रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली असून वांद्र्यासह काही भागात अद्यापही पाणी साचलेलं आहे…
  3. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत… मुंबईत एनडीआरएफच्या 5 टीम तर नागपूर, चिपळूण, रत्नागिरी आणि रायगडमध्ये प्रत्येकी 1 टीम तैनात करण्यात आली आहे…
  4. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालीये… धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी 23 फुटांवर गेली असून राजाराम बंधाऱ्यांसह 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत…
  5. वसई-विरार, नालासोपाऱ्यात पावसाचा जोर कायम असून वसई-विरारमध्ये अनेक भागात पाणी साचलं आहे… विरारच्या विवा कॉलेज परिसरातील रस्ता पाण्याखाली.
  6. मुंबईच्या बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेर मुसळधार पावसामुळे परिसरास तलावाचे स्वरूप आले असुन रस्ते जलमय
  7. कल्याण पूर्व येथे हनुमाननगर टेकडीची दरड कोसळली…दरड कोसळेल्या परिसरातील 5 कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलवलं
  8. पनवेल परिसरात कालपासून मुसळधार पावसाने हजेरी,. अद्यापही रिमझिम पाऊस सुरूच, त्यामुळे पळस्पे फाट्याजवळ रस्ते जलमय

वाचा पावसाचे लाईव्ह अपडेट्स : महाराष्ट्रात मुसळधार पावसाची हजेरी! पावसामुळे कुठे काय स्थिती : LIVE Updates

हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.