विरोधक आव्हान देत म्हणाले, पुन्हा निवडून येऊन दाखवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच म्हणाले, हाच ट्रेंड…

कोणी कितीही आरोप केले तरी आमचं काम सुरू राहील. तुम्ही आरोप करत राहा आणि काम करत राहू. आम्हाला आरोपांनी काही फरक पडत नाही.

विरोधक आव्हान देत म्हणाले, पुन्हा निवडून येऊन दाखवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच म्हणाले, हाच ट्रेंड...
विरोधक आव्हान देत म्हणाले, पुन्हा निवडून येऊन दाखवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच म्हणाले, हाच ट्रेंड...Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 12:39 PM

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर हिंमत असेल तर निवडून येऊन दाखवा असं आव्हान विरोधकांकडून दिलं जात होतं. त्यावर शिंदे गटाकडून काहीच प्रतिक्रिया दिली जात नव्हती. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या बंडानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत आम्ही भरघोस मतांनी विजयी झालो आहोत. काही लोक आम्हाला निवडणूक लढवण्याचं आव्हान देत आहेत. मी त्यांना सांगतो. हाच ट्रेंड येणाऱ्या निवडणुकीतही राहणार आहे, असं जोरदार प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या नाशिकमधील 50 पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. तसेच नांदेडमधील सरपंचांनीही शिंदे गटात प्रवेश केला. या सर्वांचं शिंदे यांनी भगवा शेला देऊन स्वागत केलं. त्यानंतर शिंदे यांनी या सर्वांशी संवादही साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गट आणि विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

हे सुद्धा वाचा

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. काही लोकं काम कमी करून अधिक दाखवतात. आमचे लोक अधिक काम करून कमी दाखवतात. आमचे पंचायतीत सर्वाधिक सरपंच निवडून आले. एक दिवस या सर्व सरपंचांचा मेळावा घेतला जाईल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सरपंच निवडून आले याचा अर्थ विरोधकांनी समजून घ्यावा.

लोकमत आणि जनमत समजून घ्या. गेलेल्यांनी निवडणुकीत जिंकून येऊन दाखवा, असं आव्हान विरोधक देत होते. पण ग्रामपंचायतीतून जे चित्रं दिसतं तेच कायम राहील. येणाऱ्या निवडणुकीत हाच ट्रेंड राहणार आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

कोणी कितीही आरोप केले तरी आमचं काम सुरू राहील. तुम्ही आरोप करत राहा आणि काम करत राहू. आम्हाला आरोपांनी काही फरक पडत नाही. शेवटी आम्हाला जनतेचं काम करायचं आहे. आम्ही जनतेशी बांधील आहोत, असा चिमटाही त्यांनी काढला.

यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. नागपूरमध्ये अधिवेशनच होत नव्हतं. सरकार बदललं नसतं तर अधिवेशन झालं नसतं. तिकडे चायना आणि जापानमध्ये कोरोना आला आहे ना. पण लोकांच्या मनातील सरकार आलं आणि नागपूरमध्ये अधिवेशन घेतलं. अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्नमार्गी लावले, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.

अधिवेशनात घोटाळ्यांचा बॉम्ब फोडणार असल्याच्या संजय राऊत यांच्या विधानाची त्यांनी खिल्ली उडवली. फटाके, बॉम्ब फोडणार होते. पण खोदा पहाड चुहाही निघाला नाही. लवंगी फटाकाही फुटला नाही. सरकारने काही तरी मोठा गुन्हा केल्याचा आव आणला गेला. त्यांनी माहिती घेतली असती तर त्यांना चांगली माहिती मिळाली असती, असा चिमटा त्यांनी काढला.

पण जाऊ द्या. त्यात मला काही जायचे नाही. आमचं मंत्रिमंडळ जे काम करत आहे. सर्व मित्रपक्ष, 50 आमदार आणि भाजपचे आमदार मतदारसंघात लोकाभिमूख काम करत आहेत. अडीच वर्ष हे काम बंद होतं. आता ते सुरू झालं आहे. त्यामुळे आमच्या पक्षात लोक येत आहे. ही कामाची पोचपावती आहे, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.