AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड राजकारणात निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले : मुख्यमंत्री

"राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले", अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगोलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड राजकारणात निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले : मुख्यमंत्री
| Edited By: | Updated on: Jul 30, 2021 | 11:29 PM
Share

मुंबई : “राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले”, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगोलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राज्याच्या राजकारणातील मोठं नाव, शेतकरी कामगार पक्षाचं जेष्ठ नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अजातशत्रू माणून म्हणून ओळख असलेले आबासाहेब अर्थात गणपतराव देशमुख यांचं आज सोलापूरमधील रुग्णालयात निधन झालं आहे. शुक्रवारी रात्री 9 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला.

“गणपतराव यांनी सर्वाधिक काळ आणि सातत्याने त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले. हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्वाचे वाटते. आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील”, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.

‘विधीमंडळ पोरकं झाल्यासारखं वाटतंय’

गणपतराव यांच्या निधनानंतर शेकाप नेते जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “गेले चार दिवस मी सोलापुरातच होतो. आज सकाळी आलो. त्यांची तब्येत सुधारत होतो. पण आता घरी पोहोचल्यावर त्यांच्या निधनाची माहिती मिळाली. त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मला फोन केला. मी पुन्हा सांगोल्याकडे निघालो आहे. आबासाहेब यांच्या निधनाने विधीमंडळ पोरकं झाल्यासारखं वाटतंय. आबासाहेब म्हणजे विधीमंडळातलं विद्यापीठ होतं. वेगवेगळ्या कायद्यांवर त्यांनी केलेली भाषणं ही ऐकताना आम्हाला एकदम भारावून जायचं. गणपतराव यांनी आम्हाला घडवलं. ग्रामीण भागात काम करताना कष्टकरांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची, त्यांच्यात जिव्हाळा निर्माण करुन त्यांच्यासोबत कसं काम करावं ही शिकवण आबासाहेबांनी आम्हाला दिली. म्हणून त्यांची पोकळी आमच्यासाठी कधीही भरुन न निघणारी आहे. मला आता बोलायला सुद्धा शब्द कमी पडत आहेत. गेले तीन दिवस मी त्यांच्याजवळ रुग्णालयातच होतो”, असं जयंत पाटील म्हणाले.

गणपतराव देशमुख 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले

गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवले.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे आबासाहेब देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले.

आबासाहेब देशमुखांनी सांगोल्यातून सगळ्यात पहिल्यांदा 1962 च्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर 1972 आणि 1995 या दोन पंचवार्षिक वगळता प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातील जनतेने त्यांच्या निस्सीम प्रेम केलं.

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

संबंधित बातम्या :

राजकारणातील अजातशत्रू हरपला, ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.