मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आघाडीच्या आमदारांशी बोलणार; तीन दिवस मॅरेथॉन बैठका

| Updated on: Feb 15, 2021 | 8:31 PM

त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.  (CM Uddhav Thackeray Meeting With All maha vikas aghadi MLA)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आघाडीच्या आमदारांशी बोलणार; तीन दिवस मॅरेथॉन बैठका
CM Uddhav Thackeray
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील सर्व आमदारांची बैठक आयोजित केली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली होती. याबाबत पहिली बैठक उद्या संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. (CM Uddhav Thackeray Meeting With All maha vikas aghadi MLA)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक पार पडणार आहे. नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर पहिल्यांदाच ही बैठक पार पडत आहे. त्यामुळे या बैठकीकडे विशेष लक्ष लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरेंची तिन्ही पक्षांच्या आमदाराबरोबर डिनर डिप्लोमसी करणार आहेत. उद्यापासून सलग तीन दिवस महाविकासआघाडीतील आमदारांच्या बैठक होणार आहे. याची पहिली बैठक उद्या संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

या बैठकीत वाढते कोरोना रुग्ण, मुंबई लोकल, विधानसभा अध्यक्षपद यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप याबाबतची काहीही माहिती समोर आलेली नाही.

महाराष्ट्रात 24 तासात 4 हजार बाधितांची नोंद

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसात राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात 5 पटीने वाढ झाली आहे.  महाराष्ट्रात 11 फेब्रुवारीला राज्यात 652 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. तर 13 फेब्रुवारीला 3 हजार 670 जणांना कोरोनाची लागण झाली. तर काल तब्बल 4092 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी राज्यात 4,092 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यात 1,355 जण कोरोनामुक्त झाले असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 20 लाख 64 हजार 278  जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 19 लाख 75 हजार 603 जण बरे झाले आहेत. यातील 51 हजार 529 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 35 हजार 965 रुग्णांवर उपचार सुरु आहे. (CM Uddhav Thackeray Meeting With All maha vikas aghadi MLA)

संबंधित बातम्या : 

Mumbai corporation election | मुंबई मनपा स्वबळावर लढणार, बिनधास्त नाना पटोलेंची बेधडक घोषणा

…तर लोकलसंदर्भातही पुन्हा एकदा मोठा निर्णय घ्यावा लागेल, अतिरिक्त पालिका आयुक्तांचे सूतोवाच