AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CNG Shortage In Mumbai: विकेंडला फिरायला जाणाऱ्यांच्या आनंदावर पाणी, मुंबईत सीएनजीचा तुटवडा

लागून सुट्या आल्याने अनेकांनी शहराबाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला आहे, मात्र सीएनजीचा तुटवडा (CNG Shortage In Mumbai) निर्माण झाल्याने मुंबईकरांच्या आनंदावर पाणी फेरले गेले आहे.

CNG Shortage In Mumbai: विकेंडला फिरायला जाणाऱ्यांच्या आनंदावर पाणी, मुंबईत सीएनजीचा तुटवडा
सीएनजी पंप Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 13, 2022 | 7:18 AM
Share

मुंबई, वाढत्या इंधन दरवाढीला पर्याय म्हणून अनेक मुंबईकरांनी वाहनांमध्ये सीएनजीचा वापर सुरु केला पण मागणी पेक्षा पुरवठा कमी होत असल्याने सीएनजी पंपावर CNG not available चे फलक वाहन चालकांची निराशा करीत आहे. लागून सुट्या आल्याने अनेकांनी शहराबाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला आहे, मात्र सीएनजीचा तुटवडा (CNG Shortage In Mumbai) निर्माण झाल्याने मुंबईकरांच्या आनंदावर पाणी फेरले गेले आहे. सलग जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईकरांनी लाँग वीकेण्डची मजा लुटण्यासाठी लोणावळा, अलिबाग तसेच अन्य पिकनिक स्थळांकडे कूच केल्याने ट्रॅफिक जाम झाले आहे. त्यातच सीएनजी वाहनांनी वारेमाप इंधनाचा वापर केल्याने सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक सीएनजी केंद्रांवर रांगा लागल्या आहेत.

अनेक दिवसानंतर अशा सलग सुट्ट्या आल्याने ट्रेन, विमाने, खासगी बस, ओला-उबर यांना प्रचंड मागणी आली असून मुंबई ते पुणे एक्सप्रेस वे तसेच अन्य महामार्गांवर प्रचंड ट्रॅफिक वाढले आहे. मुंबईकर बॅगा भरून सहलींच्या ठिकाणी रवाना झाले आहेत. शनिवारी अनेक सरकारी कार्यालयांना सुट्टी असते. त्यातच रविवार, सोमवारी स्वातंत्र्य दिनाची सुट्टी, त्यानंतर 16 ऑगस्टला पारसी नववर्ष अशा सलग सुट्ट्या आल्याने पावसाळी सहलींना चांगलेच पेव फुटले आहे.

त्यात सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने सीएनजी पुरवठ्यावरही परिणाम जाणवत आहे. कोरोनाच्या लाटा ओसरल्यानंतर गेली दोन वर्षे घरात अडकून पडलेल्या मुंबईकरांना आता घराबाहेर पडण्याची ओढ लागली आहे. थंडी व पावसाळ्याचा आनंद घेता येईल अशा पर्यटन स्थळांचे जास्त आकर्षण असून  त्या ठिकाणांवर मुंबईकरांची पावलं वळली आहेत. कर्जत, रायगड तालुक्‍यातील अनेक रिसॉर्टचे बुकिंग फुल्ल झाले आहे.

मुंबईत आठ लाख सीएनजी वाहने

मुंबईत 42 लाख 81 हजार 251 वाहने असून त्यात 2 लाख 33 हजार 325 ऑटो रिक्षा,44 हजार 171 मीटर टॅक्सी, तर 3,600 स्कूलबस आहेत. ही वाहने सीएनजावरच चालतात. मुंबईत 2019-20 च्या आकडेवारीनुसार दर दहा वाहनांपैकी दोन वाहने सीएनजी होती.

माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.