AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत यांचं भाष्य, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून स्वागत, नेमकं काय घडलं?

राजकीय कार्यकर्ता म्हणून मी त्याचं स्वागत करेन, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

संजय राऊत यांचं भाष्य, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून स्वागत, नेमकं काय घडलं?
सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं विधान Image Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 10, 2022 | 8:44 PM
Share

मुंबई : संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. या राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे, असं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. महाराष्ट्रात कटुता राजकारणात कधीच नव्हती. राज्यात आम्ही महाविद्यालयात असताना आम्हाला अनेक लोकं उदाहरणं द्यायचे. एखादा नेता हा दुसऱ्या नेत्याच्या विरोधात जाहीर सभा घेण्यासाठी यायचा. रात्री त्यांच्याच घरी मुक्कामानं असायचा. अशी अनेक उदाहरणं राज्यात होती.

विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे हे मुद्दे, तर्क, विषयाच्या आधारावर चर्चा करत असतं. मुद्द्यांची धार किती तेज आहे, असं वाटायचं. पण, त्यांची मैत्रीही तशीच होती. पण, अडीच वर्षांत राजकारण मुद्द्यांवरून गुद्द्यावर गेलंय, अशी खंत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

मुद्द्याम काही नेत्यांच्या संदर्भात आश्चर्य वाटायचं. काही नेत्यांनी टोपणं नाव वापरायचं. यातून हे राजकारण मुद्यांवरून गुद्द्यांवर गेलंय. वैचारिक मतभेद असावेत.

देवेंद्र फडणवीस यांनी इच्छा व्यक्त केली. त्यावर सामन्यानं एका अग्रलेखात त्याची सहमती दाखविली. संजय राऊत यांनी यासंदर्भात भाष्य केलं. राजकीय कार्यकर्ता म्हणून मी त्याचं स्वागत करेन, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

गुजरातमध्ये दौऱ्यात गेलो होते. संजय गांधी नॅशनल पार्कमधील सिंहाचा मृत्यू झाल्यानंतर सफारी बंद करण्यात आली. सिंह नर व मादी गुजरातमधून आणण्याची अनुमती आली आहे. संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सफारी पुन्हा सुरू करतोय, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

काही भागात वाघांची संख्या बेसुमार वाढली. १२ बाय १२ स्वेअर किलोमीटरचं जंगल एका वाघासाठी लागतं. पाच वाघांना रिलोकेट केलं जाणार आहे.

Follow Us
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी