काँग्रेसची ‘न्याय योजना’, राज्यातील 29 हजार कुटुंबांना प्रत्येकी 200 रुपयांचं वाटप

| Updated on: May 21, 2020 | 4:26 PM

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 29 व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशभरात ही योजना लाँच केली होती.

काँग्रेसची न्याय योजना, राज्यातील 29 हजार कुटुंबांना प्रत्येकी 200 रुपयांचं वाटप
Follow us on

मुंबई : युवक काँग्रेसकडून राज्यात ‘न्याय योजने’ची प्रतिकात्मक (Congress Nyay Scheme) अंमलबजावणी करण्यात आली आहे. आज राज्यातल्या 29 हजार कुटुंबियांना 200 रुपये देण्याची प्रतिकात्मक योजना काँग्रेसने हाती घेतली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 29 व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशभरात ही योजना लाँच (Congress Nyay Scheme) केली होती.

या अंतर्गत युवक काँग्रेस राज्यातील 29 हजार कुटुंबियांना प्रत्येकी 200 रुपये देण्यात येणार आहे. न्याय योजनेच्या महिन्याच्या 6 हजार रुपयांच्या योजनेचं प्रतिकात्मक वाटप आज युवक काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

कोरोनामुळे मंदीचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्वाधिक जनता ही घरात अडकून पडली आहे. या आर्थिक अडचणीत गोरगरीबांना मदत करण्यासाठी, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एखादी योजना राबवावी, अशी मागणी काँग्रेसने (Congress Nyay Scheme) केली होती. पुढील सहा महिन्यांसाठी प्रत्येक कुटुंबाला 6 हजार रुपये द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली.

या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील 29 हजार कुटुंबियांना युवक काँग्रेसकडून 200 रुपये देण्यात आले आहेत. महिन्याला 6 हजार म्हणजेच दिवसाला 200 रुपये अशी प्रतिकात्मक मदत युवक काँग्रेसने दिली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 29 व्या पुण्यतिथीनिमित्त 21 मे रोजी ही मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.

Congress Nyay Scheme

संबंधित बातम्या :

स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार, सोनिया गांधींची घोषणा

17 मेनंतर काय? लॉकडाऊन वाढवण्याचे निकष काय? सोनिया गांधींची मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती

गरीब मजुरांच्या खात्यात तातडीने 7500 रुपये भरा, सोनिया गांधींची मागणी

पुढील सहा महिने गरिबांना 10 किलो धान्य मोफत द्या, सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र