पुढील सहा महिने गरिबांना 10 किलो धान्य मोफत द्या, सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र

पुढील सहा महिने गरिबांना 10 किलो धान्य मोफत द्या, सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र

सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी देशातील गरिब, होतकरु जनतेला पुढील 6 महिन्यांसाठी मोफत 10 किलो अन्नधान्य द्यावं, अशी मागणी केली आहे (Sonia Gandhi letter to PM Modi).

चेतन पाटील

|

Apr 13, 2020 | 6:03 PM

नवी दिल्ली : कोरोनाचा सामना करणाऱ्या देशातील लाखो गरिबांना (Sonia Gandhi letter to PM Modi ) दर महिन्याला 10 किलो अन्नधान्य मोफत द्या, अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी देशातील गरिब, होतकरु जनतेला पुढील 6 महिन्यांसाठी मोफत 10 किलो अन्नधान्य द्यावं, अशी मागणी केली आहे (Sonia Gandhi letter to PM Modi).

“देशातील लाखो गरिब नागरिक कोरोनाविरोधाच्या लढाईत झुंझत आहेत. त्यांच्यापर्यंत अन्नधान्याचा पुरवठा होणं गरजेचं आहे. केंद्र सरकारकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांनी गरिब आणि होतकरु जनतेला पुढील 6 महिन्यांसाठी मोफत 10 किलो अन्नधान्य द्यावं. याशिवाय या योजनेसाठी गरिबांना रेशन कार्डची सक्ती करु नये. कारण देशाच्या विविध भागात अनेक स्थलांतरीत मजूर अडकलेले आहेत”, असं सोनिया गांधी पत्रात म्हणाल्या आहेत.

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळे हातावरती पोट असणाऱ्या लाखो मजुराचं आणि कुटुंबांचं मोठं नुकसान झालं आहे. या नागरिकांसाठी केंद्र सरकारने मोठं पॅकेज जाहीर केलं आहे. पुढच्या तीन महिन्यांसाठी या नागरिकांना 5 किलो अन्नधान्य मोफत दिलं जाणार आहे. मात्र, हीच मदत 10 किलोपर्यंत वाढवण्याची मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. हा लॉकडाऊन 14 एप्रिल रोजी म्हणजेच उद्या संपणार आहे. मात्र, देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 9 हजारच्या पार गेला आहे. त्यामुळे हा लॉकडाऊन सरकार 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या :

अदृश्य शत्रूविरुद्ध महायुद्ध, राहुल गांधींच्या सूचना मोदींनी ऐकायला हव्या होत्या : बाळासाहेब थोरात

‘या’ राज्यांमध्ये मद्यविक्री पुन्हा सुरु, तळीरामांच्या रांगाही लागल्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें