मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव

खबरदारीची उपाययोजना म्हणुन मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांची तात्काळ कोविड १९ संसर्ग तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांचीही अधिक काळजी घेतली जात आहे.

मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव
Uddhav Thackeray Chief Minister of Maharashtra
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 7:19 PM

 मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) सुधीर नाईक यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. नाईक यांची कोविड-19 संसर्ग चाचणी पाँझिटीव्ह आल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबई सेंट्रल येथील वाँक्हार्ट हाँस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणुन मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांची तात्काळ कोविड 19  संसर्ग तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांचीही अधिक काळजी घेतली जात आहे. मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानाचं सँनिटायझेशन करण्यात आलंय.

यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व मुलगा पर्यटन, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनाही मार्च 2021 मध्ये कोरोना संसर्ग झाला होता. त्यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

राज ठाकरेंना ऑक्टोंबरमध्ये झाला होता कोरोना

महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना ऑक्टोबरमध्ये मध्ये कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांच्यासोबत आईचा कोरोना चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला होता. राज यांना कोरोनाची सौम्य असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले होते.

 

हे ही वाचा

Babasaheb Purandare | इतिहासाची खडानखडा माहिती असणारे बाबासाहेब पुरंदरे नेमके कोण?

Babasaheb Purandare Death | शिवशाहीरांच्या निधनावर मोदींचं ट्विट, गडकरी, राऊत, इतर नेते नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्रात OBC आरक्षणाची वाताहत; प्रकाश शेंडगे यांचा ‘मविआ’ सरकारवर निशाणा, 26 तारखेला महामोर्चा काढणार!