AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात कोरोनासदृश्य स्थिती, काळजी घेण्याचे आरोग्यमंत्र्याचे आदेश

सिंगापूर आणि इतर देशात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. आता भारतातही भयावह आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे.

राज्यात कोरोनासदृश्य स्थिती, काळजी घेण्याचे आरोग्यमंत्र्याचे आदेश
| Updated on: May 20, 2025 | 4:54 PM
Share

सिंगापूर आणि हाँगकाँग इतर देशात कोरोना पुन्हा झपाटयाने वाढत आहे. आता राज्यातही सावधानता बाळगण्याची सूचना जारी झाल्या आहेत. कोरोनामुळे २५७ केसेस महाराष्ट्रात आढळल्या आहेत. मुंबईतही कोरोनाच्या केसेस आढळल्या आहेत.मुंबई महानगरापालिकेच्या आकडेवारीनुसार 53 कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहे. तसेच कोरोनाच्या संक्रमनामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

हाँगकाँग आणि सिंगापूर या दोन आशियाई देशांमध्ये कोरोना विषाणूच्या केसेस झपाट्याने वाढत आहेत. सिंगापूरमध्ये रुग्णांच्या संख्येत २८% वाढ झाली आहे, तर हाँगकाँगमध्ये फक्त एका आठवड्यात ३१ गंभीर रुग्णांची नोंद झाली आहे. कोविड-१९ च्या रुग्णांची अंदाजे संख्या १४,२०० पर्यंत वाढल्याने सिंगापूरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल होण्याच्या संख्येतही सुमारे ३०% वाढ झाली.  महाराष्ट्रात  कोरोनाच्या  २५७ केसेस आणि मुंबईतही ५३ केसेस आढळल्या आहेत.

भारतातही कोरोनाचे आकडे वेगाने वाढत आहेत. १२ मे पासून कोरोनाचे १६४ नवे रुग्ण आढळ असल्याने खळबळ उडाली आहे.एकूण सक्रिय कोविड प्रकरणांची संख्या २५७ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडू आघाडीवर ही परदेशी प्रवासी सर्वाधित येणारी राज्ये आघाडीवर आहेत. आता आरोग्य मंत्रालयानेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

आरोग्य मंत्र्यांनी काय म्हटले?

त्यामुळे साथीची स्थिती असल्याची कबूली राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहे. मुंबईत आढळलेल्या ५३ केसेसपैकी  दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यांची प्रकृती आधीपासूनच गंभीर होती. त्यातील एकाला कर्करोग होता तर दुसऱ्याला नेफ्रोटिक सिंड्रोम होते. हे दोन्ही रुग्ण मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल होते.

केंद्राची दक्षता

कोरोनाच्या वाढत्या केसेसवर  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व स्थितीवर आम्ही नजर ठेवून असून सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज करण्यात आल्याचे म्हटले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. गेल्या सोमवारी, आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, आपत्कालीन वैद्यकीय मदत विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि केंद्र सरकारी रुग्णालयांमधील तज्ज्ञांसह एक आढावा बैठक झाली असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.