वेगवान लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेचा अ‍ॅक्शन प्लॅन, जाणून घ्या सर्वकाही

| Updated on: Jun 20, 2021 | 3:43 PM

Covid Vaccination | मुंबईत 227 नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. आरोग्य शिबीरासारखे लसीकरण सुरू करू. तसेच राहत्या घरापासून जवळ नागरिकांना लस उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न असल्याचेही किशोरी पेडणकेर यांनी सांगितले.

वेगवान लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेचा अ‍ॅक्शन प्लॅन, जाणून घ्या सर्वकाही
कोरोना लसीकरण
Follow us on

मुंबई: केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 21 तारखेपासून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू होत आहे. केंद्र सरकारने जरी मोफत मोठ्या प्रमाणात लसीकरण (Vaccination) करण्याची घोषणा जरी केली असली तरी मुबलक लस मिळेल का हा प्रश्न आहे यामुळे राज्य सरकारप्रमाणे मुंबई महापालिकेने लसीकरणचा संभाव्य प्लॅन तयार केला आहे. (Coronavirus Vaccination in Mumbai)

काही खासगी रुग्णालयात पैसे देऊन लसीकरण सुरू आहे. खासगी सेंटरवर हजारो रुपये मोजुन श्रीमंतांनाच या वषोगटासाठी लस मिळाली. आता सर्वात मोठ्या लोकसंख्येसाठी सर्वसामान्य मुंबईकरांचं लसीकरण पार पाडण्याचा टप्पा आलाय. देशभरात बहुप्रतिक्षीत असलेलं तरुणांचं मोफत लसीकरण सुरु होतंय. त्यासाठी मुंबई महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे.

मुंबईत टप्पे पाडून लसीकरण केले जाईल. विशेष करून सुपरस्प्रेडरना लसीकरणात प्राधान्य दिले जाईल. व्यवसायानुसार सुपर स्प्रेडर गट जसे- फेरीवाले , रिक्षाचालक यांचे लसीकरण करण्याला प्राधान्य दिले जाईल.तसेच गुरुवार ते शनिवार या दिवशी नोंदणीकृत लोकांचे लसीकरण केले जाते त्या दिवशी काही प्रमाणात वॉक इन लसीकरण सुरू केले जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. मुंबईत 227 नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. आरोग्य शिबीरासारखे लसीकरण सुरू करू. तसेच राहत्या घरापासून जवळ नागरिकांना लस उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न असल्याचेही किशोरी पेडणकेर यांनी सांगितले.

लसीकरणाच्यादृष्टीने महत्वाचे मुद्दे

केंद्राकडून 8 लाख 70 हजारपेक्षा जास्त डोस मिळण्याची अपेक्षा

सोमवार, मंगळवार, बुधवार- 100% वॉक इन लसीकरण

गुरु, शुक्र, शनिवार- काही टक्के रजिस्ट्रेशन व काही टक्के वॉक इन लसीकरण

 

मुंबईत पार पडलेले सध्याच लसीकरण

एकूण झालेले लसीकरण – 4462767

18 ते 44 वयोगटातील लसीकरण – 1063792

45 ते 59 वयोगटातील लसीकरण – 1375665

60 वरील वयोगटातील लसीकरण – 1336547

(Coronavirus Vaccination in Mumbai)