AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत मोठी दुर्घटना; क्रेन कोसळली, 10 जण जखमी

मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे, क्रेन कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आठ ते दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. क्रेनद्वारे जेसीबी मशीन उचलताना ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत मोठी दुर्घटना; क्रेन कोसळली, 10 जण जखमी
Kurla crane accidentImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 21, 2026 | 7:26 AM
Share

मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे, क्रेन कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आठ ते दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. क्रेनद्वारे जेसीबी मशीन उचलताना ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील कुर्ला परिसरात ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत  क्रेन आणि जेसीबी दोन्ही मशीन खाली कोसळल्या. क्रेनने जेसीबी शिफ्ट करत असताना हा परिसर रिकामा करण्यात आला होता, त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. परंतु  या घटनेत ८ ते १० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे,मात्र सुदैवाने अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिती नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी (पहाटे) २ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास घडला आहे.

मध्य रेल्वेने (Central Railway) दिलेल्या माहितीनुसार, “मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) च्या वतीने जवळच सुरू असलेल्या एका कामाच्या ठिकाणी क्रेन कुर्ला आणि ट्रॉम्बे दरम्यान ओव्हरहेड इलेक्ट्रिक (OHE) लाईनवर कोसळली. या रेल्वे लाईनचा वापर प्रामुख्याने मालगाड्यांच्या वाहतुकीसाठी केला जातो, त्यामुळे सामान्य लोकल किंवा प्रवासी ट्रेन सेवांवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

अपघाताच्या इतर बाजूंचाही शोध घेतला जात आहे. सध्या घटनास्थळावरून ढिगारा आणि मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने या अपघातात २ जण जखमी झाल्याची पुष्टी केली आहे, तर स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ८ ते १० जण जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. ही घटना मुंबई-कुर्ला येथील कुरेशी नगर भागात घडली आहे. शिफ्टिंग दरम्यान क्रेन एका घरावर कोसळल्याचे समोर आले आहे. या भागात एमएमआरडीएचे काम सुरू होते.मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानुसार, एमएमआरडीएची ही क्रेन कुर्ला आणि ट्रॉम्बे दरम्यानच्या सिंगल लाईन रेल्वे ट्रॅकवर कोसळली. मालवाहू लाईन असल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली नाही. या अपघाताला पूर्णपणे एमएमआरडीए (MMRDA) जबाबदार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

Follow Us
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन, पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, पण... राम कदमांची टीका
Video : बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, त्यांच्यानंतर मात्र..., राम कदमांची ठाकरे बंधूंवर टीका
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट..
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक!