AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोन आला, फाईल डाउनलोड केली अन् मग जे घडलं…; टाटा पॉवरच्या नावाखाली मुंबईत हायटेक दरोडा

सांताक्रूझ येथील एका निवृत्त आयटी व्यावसायिकाची बनावट e-KYC कॉल आणि APK फाईलद्वारे २.५ लाखांची फसवणूक झाली आहे. टाटा पॉवरचे अधिकारी असल्याचे भासवून सायबर भामट्यांनी हा गुन्हा केला.

फोन आला, फाईल डाउनलोड केली अन् मग जे घडलं...; टाटा पॉवरच्या नावाखाली मुंबईत हायटेक दरोडा
cyber fraud
| Updated on: Apr 27, 2026 | 1:56 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्ह्यात सातत्याने वाढ होत आहे. सायबर भामट्यांनी आता सुशिक्षित आणि तांत्रिक ज्ञान असलेल्या नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सांताक्रूझ येथील एका ७० वर्षीय निवृत्त आयटी व्यावसायिकाला टाटा पॉवरचे अधिकारी असल्याचे भासवून तब्बल २.५ लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वांद्रे येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, ३ एप्रिलला तक्रारदाराने आपल्या वीज कनेक्शनमधील नाव बदलण्यासाठी टाटा पॉवरकडे अर्ज केला होता. यानंतर ६ एप्रिलला त्यांना नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा अधिकृत संदेशही मिळाला. त्याचवेळी १४ एप्रिलला एका अज्ञात व्यक्तीचा व्हॉट्सअॅप कॉल आला. समोरच्या व्यक्तीने आपण टाटा पॉवरमधून बोलत असल्याचे सांगितले. यानंतर नवीन नावाच्या अपडेटसाठी e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे सांगितले.

फसवणूक करणाऱ्या व्यक्तीकडे तक्रारदाराचा ग्राहक क्रमांक (Consumer Number) आणि घराचा पत्ता अशी अत्यंत वैयक्तिक आणि अचूक माहिती होती. यामुळे तक्रारदाराला समोरची व्यक्ती खरं बोलत असल्याचे वाटले. त्यांनी कोणताही संशय घेतला नाही.

यानंतर आरोपीने तक्रारदाराला एका लिंकवरून बनावट APK फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडले. तक्रारदाराने ती फाईल इन्स्टॉल करताच, आरोपीने त्यांच्या फोनचा ताबा मिळवला. यानंतर आरोपीने केवळ बँक खात्यातील शिल्लक रक्कमच काढली नाही, तर तक्रारदाराच्या नावावर एक तात्काळ कर्ज देखील मंजूर करून घेतले. अशा प्रकारे एकूण २.५ लाख रुपये लंपास करण्यात आले. यानतंर पोलीस तपासात असे समोर आले आहे की, फसवणुकीच्या या रक्कमेचा मोठा हिस्सा आरोपीने स्वतःचे क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी वापरला. सध्या पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.

सायबर पोलिसांचा इशारा

दरम्यान सायबर पोलिसांच्या मते सध्या डेटा चोरीच्या माध्यमातून लोकांची वैयक्तिक माहिती मिळवून अशा प्रकारचे गुन्हे केले जात आहेत. कोणतीही अधिकृत संस्था व्हॉट्सअॅप कॉलवर e-KYC करत नाही किंवा कोणतीही फाईल इन्स्टॉल करण्यास सांगत नाही. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?