Dattatray Bharane: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर, आदेशाची अंमलबाजवणी कधी? कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी माहिती

Dattatray Bharane on Dry Drought: राज्य सरकारने 265 तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. राज्यात एकंदरीतच चिंतेचे वातावरण आहे. सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर केला असला तरी या आदेशाची अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार याविषयीची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी माहिती दिली.

Dattatray Bharane: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर, आदेशाची अंमलबाजवणी कधी? कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी माहिती
दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री
| Updated on: Sep 26, 2026 | 12:13 PM

राज्यातील 265 तालुक्यात सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर केला. जवळपास 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यात बांधावर जाऊन दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर तातडीने सूत्र हलली आणि राज्यात 5 ऑक्टोबरची वाट न पाहता सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर केला. पण हा दुष्काळ जाहीर झाल्यावर पुढील प्रक्रिया कधी सुरू होणार याविषयीची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी

आपल्या सर्वांना माहिती आहे की, एल निनोच्या संकटामुळे पावसाचा खंड पडला आहे. शेतकऱ्यांनी जे पिकं घेतली ती अक्षरशः जळाली. पीक हातचं गेल्याने माझा शेतकरी हा खूप अडचणीत आला होता. या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार, सर्व मंत्र्यांनी त्यांच्या विभागात दौरा केला होता. त्यांचे दुःख, त्यांची व्यथा, पिकांची अवस्था पाहून या सर्वांनी याविषयीची माहिती दिली. यापूर्वीच अधिसूचना काढू असे जाहीर झाले होते. त्याप्रमाणे राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्याचे आदेश निघाला आहे, असे कृषिमंत्री यांनी सांगितले.

दुष्काळ जाहीर, अंमलबजावणी कधी?

शेतकऱ्यांना एकच सांगणे आहे की, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही सर्वच तुमच्या सोबत आहोत. राज्य सरकार निश्चितपणे आर्थिक हातभार लावणार आहे. जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल पुढील ऑगस्ट महिन्यापर्यंत उपलब्ध पाणी साठ्यानुसार, पाणी राखीव ठेवण्याचे निश्चित झाले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. आज अधिसूचना जाहीर झाली. 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला. आता आपोआपच सर्व सुविधा आणि सवलती सुरू होतील, अशी महत्त्वाची माहिती भरणे यांनी दिली.

GR पाहिल्याशिवाय प्रतिक्रिया नाही

दुष्काळ हा संवेदशिल विषय आहे. यामध्ये राजकारण करायचं नाही. यामध्ये आपले लोक अडकले आहे. मला वाटल होते शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार. एक कमिटी तयार केली आहे, मात्र त्या कमिटीमध्ये काय असेल हे माहिती नाही. त्यामुळे आम्ही निराश झाले आहोत. माझी मागणी असते चांगला पाऊस पडू दे. सरकारने मोठी मदत दिली पाहिजे. पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि बाहेर आल्यावर कळले की राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला. सरकारने उशीरा का असेना चांगला निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकारने तिजोरी उघडावी. दुष्काळाचा जीआर वाचल्याशिवाय त्यावर भाष्य करणे योग्य नसल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us