Delhi CJP Protest: सीजेपी आंदोलनकर्त्यांसोबत दगाफटका? ते 50 हजार RSS-BJP चे लोक… प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा

Prakash Ambedkar on CJP Protest Jantar Mantar Delhi: आज शनिवारी, 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर सीजेपी आंदोलन सुरू करणार आहे. त्यांना पोलीस रोखणार आहे. त्याचवेळी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.

Delhi CJP Protest: सीजेपी आंदोलनकर्त्यांसोबत दगाफटका? ते 50 हजार RSS-BJP चे लोक... प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा
प्रकाश आंबेडकर यांचा सीजेपी आंदोलनावरून मोठा दावा
| Updated on: Oct 10, 2026 | 9:59 AM

मयुरेश जाधव, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी दिल्लीत रणसंग्राम छेडणार आहे. आज, शनिवारी 10 ऑक्टोबर रोजी जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन सुरू होत आहे. त्यांना रोखण्यासाठी पोलीस चौका चौकात उभे ठाकले आहे. सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे टेहाळणी करण्यात येत आहे. काही ठिकाणी इंटरनेट तात्पुरते बंद करण्यात आले आहे. दिल्लीला लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. ताज्या अपडेटनुसार, पोलीस, राखीव दलाच्या तुकड्या मिळून 35 हजारांहून अधिकचा फौजफाटा दिल्लीत तैनात करण्यात आला आहे. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे.

सरकारला सिव्हील वॉर हवी आहे

Loading...

प्रकाश आंबेडकर यांनी दिल्लीतील घडामोडींवर स्पष्ट मत मांडलं आहे. दिल्ली ही छावणी झाली आहे. ट्रेन बंद, गाड्या ज्या पब्लिक बाहेर काढतेय त्यांची ही चेकिंग सुरू झाली आहे. बाहेरून जाणारे कार्यकर्ते त्यांना थांबवण्यात आलं आहे. हुतात्मा स्मारकावर पण आंदोलन होऊ देणार नाहीत. गैर संविधानिक भूमिका शासनाची आहे. शासनाला सिव्हील वॉर, गृहयुद्ध पाहिजे अशी परिस्थिती आहे, असा मोठा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

आंदोलकांसोबत दगाफटका?

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यानुसार, या आंदोलनाचा सामना करण्यासाठी RSS आणि BJP ने 50 हजार जणांना ट्रेन केलेले आहे आणि त्यांना दिल्लीत आणून ठेवलं आहे. यामुळे सीजेपीच्या आंदोलकांसोबत दगा फटका होण्याची शक्यता आहे, असा खळबळजनक दावा आंबेडकर यांनी केला आहे.

शासनाची भूमिका पूर्णपणे चुकीची आहे. आता पर्यंत झालेली आंदोलनं शांतपणे पार पडली. कधी ही शासनाने आंदोलन दडपण्याची भूमिका घेतली नाही. पण आता दडपण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहेत. शासनाला सांगतो, शांतपणे आंदोलन पार पडूदेत. हुकूमशाही करू नाका. तुम्ही मालक नाहीत. दिवस भरात काही घडणार नाही अशी अपेक्षा आहे. आंदोलन होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला.

तरुणांना आव्हान देऊ नका

दिल्लीत राहणार्‍या लोकांना त्रास होऊ नये असं चाललं आहे. लोक 5 6 किलोमीटर चालत येत आहेत. आंदोलनच होऊ द्यायचं नाह. त्यांच्यापुढे लोकांचं कर्तृत्व येऊ नये असं प्रयत्न सुरू आहे. आंदोलकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी तरुणांना आव्हान देऊ नये. Emergency कायदा आता वापरण्यात येत आहे. हे सरकार हिटलर शाहीच सरकार आहे, त्यामुळे आम्ही चुकतो किंवा आम्ही कोणाशी चर्चा करायला हवी असं त्यांचं नाही. सरकारने जे चुकलं ते चुकलं असं म्हणायला पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले.

आता दिपके यांनी मागं हटू नये

त्यांचं आंदोलन सुरूच होईल कदाचित त्यांना अटक पण होईल, FIR पण दाखल होईल, जेलमध्ये टाकण्यात येईल. पण अभिजित दिपके यांनी आता हटू नये. यश हा वेगळा भाग आहे तर मतदान रद्द केलेत, त्यामुळे यश मिळणार. राहुल गांधी यांना एवढंच म्हणणार की अमिताभ बच्चन यांनी म्हंटलं होत एक नट यां पुढे पिक्चर कॅरी करणार नाही इतरांना पण करावं लागेल, राहुल गांधी यांच्या डोक्यात बसलंय काँग्रेस पक्ष एक आहे. त्यांनी हे डोक्यातून काढून सर्वांनाच सोबत घ्यावं ज्यामुळे यश मिळेल. राजकीय पक्ष जे आहेत हे प्रत्येक राज्यात नाहीत एकत्र येवून लढल्याशिवाय हे सरकार बाजूला करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us