AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Protest: दिल्ली पोलीस फुल तयारीत! झुरळांना ताब्यात घेतल्यानंतर कुठं डांबणार? सीजेपीविरोधात मेगा प्लॅन

Delhi CJP Jantar Mantar Protest: कॉकोरच जनता पार्टी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मैदानात उतरली आहे. आज 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर त्यांचे आंदोलन सुरू होणार आहे. त्यापूर्वीच पोलिसांनी मोठी कसरत सुरू केली आहे. काय आहे प्लॅन?

CJP Protest: दिल्ली पोलीस फुल तयारीत! झुरळांना ताब्यात घेतल्यानंतर कुठं डांबणार? सीजेपीविरोधात मेगा प्लॅन
10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर सीजेपीचे आंदोलन
| Updated on: Oct 10, 2026 | 9:25 AM
Share

Delhi CJP Jantar Mantar Protest: कॉकरोच जनता पार्टीने जंतरमंतरवर पुन्हा एकदा आंदोलनाचा नारा दिला आहे. या आंदोलनात तरुणाई धडकण्याची चिन्हं आहेत. यामुळे दिल्लीत पोलिसांचा गराडा पडला आहे. राष्ट्रीय राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. केंद्रीय गृह सचिवांनी राजधानीत चोख बंदोबस्ताचे निर्देश दिले. त्यानंतर दिल्ली पोलीस आणि शीघ्र कृती दल, अर्धसैनिक दलाचे 35 हजारांहून अधिक पोलीस आणि जवान तैनात करण्यात आले आहेत. जंतरमंतर तर लष्करी छावणीत बदलले आहे. सकाळपर्यंत 200 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर अजून धरपकड सुरू आहे. या आंदोलकांना कुठे ठेवायचं याचीही योजना आखण्यात आली आहे.

10 ठिकाणी झुरळांची व्यवस्था

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी, आज प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या सीजेपीच्या सदस्यांना, आंदोलकांना ताब्यात घेण्यात येईल. त्यांना दिल्लीतील 10 ठिकाणी ठेवण्यात येईल. गोपनीय महितीनुसार शनिवारी मोठ्या संख्येने आंदोलक येण्याची शक्यता आहे. त्यासाठी दिल्ली पोलिसांनी ही कंबर कसली आहे. कॉकरोच आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना दहा ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. त्या जागा सुद्धा निश्चित करण्यात आल्या आहेत. ही सर्व ठिकाणी दिल्लीपासून दूर असतील. यामुळे पुन्हा आंदोलकांना शहरात येता येणार नाही.

या ठिकाणी डांबणार आंदोलकांना

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनुसार, कॉकरोच जनता पार्टीचे सदस्य, आंदोलकांना दिल्लीच्या जवळपासच्या ठिकाणी ठेवण्यात येईल. यामध्ये मॉडेल टाऊनमधील छत्रसाल स्टेडियम, न्यू पोलिस लाईन, बवाना येथील राजीव गांधी स्टेडियम, नांगलोईमधील सूरजमल स्टेडियम आणि दक्षिण दिल्लीतील त्यागराजन स्टेडियम, जवाहर लाल नेहरू स्टेडियम या त्या जागा असतील. पोलिसांनी याठिकाणी अगोदरच तगडा बंदोबस्त ठेवला आहे. तर दिल्लीतील चौका चौकात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्या मागणीसाठी काँग्रेसने गेल्या चार दिवसात दिल्ली दणाणून सोडली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी आणि इतर काँग्रेस खासदारांनी दिल्लीतील विविध भागात मोठे आंदोलन केले. आजपासून दिल्लीत सीजेपीने आंदोलनाचा नारा दिल्याने आणि यापूर्वीचा अनुभव पाहता दिल्ली पोलीस हायअलर्टवर आहे.

Follow Us
जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; प्रत्येक हालचाल...
Delhi CJP Jantar Mantar Protest : जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; 150 पोलिसांना बॉडी कॅमेरे, प्रत्येक हालचाल होणार...
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे
Delhi CJP Jantar Mantar Andolan : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद, इंटरनेट सेवाही...
सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्..
Delhi Jantar- Mantar CJP Andolan : सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्....
मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
Abhijeet Dipke : मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले,
Shivsena : गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले, आम्हाला गांभीर्याने....
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर