Flat | लग्झरी घरांच्या विक्रीत मोठी वाढ, स्मार्ट होम तंत्रज्ञानाचा वापर करुन घरांची निर्मिती

Flat in Pune and Mumbai | देशात श्रीमंतांच्या यादीत दरवर्षी भर पडत आहे. यामुळे महाग घरांना मागणी वाढत आहे. जानेवारी ते सप्टेंबरपर्यंतचा रिपोर्ट आला आहे. देशातील सात प्रमुख शहरांमध्ये चार कोटी किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीच्या लग्झरी फ्लॅटची विक्री वाढली आहे.

Flat | लग्झरी घरांच्या विक्रीत मोठी वाढ,  स्मार्ट होम तंत्रज्ञानाचा वापर करुन घरांची निर्मिती
luxury apartments
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 8:05 AM

मुंबई, पुणे, दि. 28 नोव्हेंबर 2023 | ‘घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती इथे असावा प्रेम-जिव्हाळा नकोत नुसती नाती’, असे कधी काळी म्हटले जात होते. परंतु आता लोकांचे जिवनमान सुधारले आहे. हातात पैसा येऊ लागला आहे. दरडोई उत्पन्न वाढत आहे. श्रीमंतांच्या यादीत दरवर्षी भर पडत आहे. यामुळे महाग घरांना मागणी वाढत आहे. सीबीआरईचा जानेवारी ते सप्टेंबरपर्यंतचा रिपोर्ट आला आहे. देशातील सात प्रमुख शहरांमध्ये चार कोटी किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीच्या लग्झरी फ्लॅटची विक्री वाढली आहे. महाग आणि लग्झरी घरांची मागणी 97 टक्के वाढली आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचा हा परिणाम आहे.

काय आहेत कारण

लग्झरी घरांची विक्री वाढण्यामागे प्रमुख कारण देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. लोकांचे उत्पन्न वाढत आहे. यामुळे महानगरांमध्ये मोठ्या आणि लग्झरी घरांना मागणी वाढली आहे. जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत ही मागणी वाढली असताना ऑक्टोंबर ते डिसेंबरपर्यंत त्यात चांगली वाढ होण्याची अपेक्षा आहे. विकासकांकडून आता स्मार्ट होम बनवण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यात स्मार्ट स्विच आणि फोनच्या क्लिकवर प्रकाश तसेच अन्य लग्झरी सुविधा दिली जाणार आहे.

दहा वर्षांचा उच्चांक

सीबीआरई रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे की, आर्थिक विकास, अनुकूल नियम आणि बदलती जीवनशैली यामुळे प्रीमियम आणि लग्झरी घरांची मागणी वाढली आहे. ही मागणी 2023 मध्ये गेल्या दहा वर्षांच्या उच्चांकावर होती. अनिवासी भारतीयांमध्ये लग्झरी घरांची लोकप्रियता वाढत आहे. आता भारतीय रिअल इस्टेटचा लग्झरी होम महत्वाचा भाग झाले आहे.

हे सुद्धा वाचा

कोणत्या शहरांत किती मागणी

लग्झरी घरांची मागणी महानगरांमध्ये वाढली आहे. एकूण लग्झरी घरांची मागणीपैकी 90 टक्के मागणी दिल्ली एनसीआर, मुंबई आणि हैदराबाद या शहरांमध्ये राहिली. दिल्ली-एनसीआरमध्ये एकूण 37 टक्केही मागणी होती. मुंबईत 35 हैदराबादमध्ये एकूण घरांच्या 18 टक्के मागणी होती. लग्झरी घरांची मागणी पुणे शहरात वाढत आहे. पुण्यात 4 टक्के ही मागणी होती.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.